Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०८, २०१९

नागपूर पत्रकार संघाकडून नाना पटोले समर्थकांचा निषेध

नागपूर/प्रतिनिधी:
nana patole साठी इमेज परिणाम
नागपूर पत्रकार संघाकडून नाना पटोले समर्थकांचा रविवारी निषेध करण्यात आला.त्यच अकारण म्हणजे काही पटोले समर्थक सोशल मीडियावर पत्रकारांना धमक्या देत आहेत. तसेच, त्यांना बदनामीकारक शिवीगाळही करत आहेत याच कृतीचा कृतीचा नागपूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व नागपूर प्रेस क्लब यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

इलेक्ट्रोनिक मिडीयाच्या पत्रकारांना पटोले समर्थकांनी आतापर्यंत लक्ष्य केले. पटोले व त्यांच्या समर्थकांचे पत्रकारांसोबतचे हे वागणे धक्कादायक आहे. पत्रकार नागरिकांपुढे सत्य बाजू मांडत असल्यामुळे झालेला जळफळाट यातून दिसून येत आहे. पत्रकार अशा भ्याड कृतीला कधीच घाबरणार नाहीत. ते आपल्या कर्तव्यांना सतत न्याय देत राहतील. प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्याला नुकसान पोहचविण्याचे काम पटोले समर्थक करीत आहे. त्यांच्या या कृतीचे कधीच समर्थन केले जाऊ शकत नाही.
 त्यांची कृती फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे पटोले व त्यांच्या समर्थकांनी तात्काळ पत्रकारांची माफी मागावी. तसेच, पोलिसांनी दोषी समर्थकांचा शोध घेऊन त्यांना दंडित करावे व पत्रकारांची बदनामी करणारी खोटी छायाचित्रे प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ व नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर व महासचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.