Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ०७, २०२१

असा चेहरा दिसण्यासाठी तिने दिड लाख रुपये खर्च केले

🌀  असा चेहरा दिसण्यासाठी तिने दिड लाख रुपये खर्च केले  🌀

_______________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_______________________________
लंडन ः जगभरात अनेक लोक असे आहेत जे बाहुलीसारखे किंवा अ‍ॅनिमेशनपटातील एखाद्या व्यक्तिरेखेसारखे दिसण्यासाठीही कॉस्मेटिक सर्जरी करून घेतात. युक्रेनमधील एका तरुणीने दीड लाख रुपये खर्च करून अनेकवेळा कॉस्मेटिक सर्जरी केली आहे. तिने अशा सर्जरी करून चेहर्‍याचे काय केले आहे हे सोबतच्या छायाचित्रावरून समजू शकेलच. तिची गालाची हाडे आता जगातील सर्वात उंच ठरली आहेत!


ही तरुणी कुणी सामान्य महिला नसून ती एक व्यावसायिक मॉडेल आहे. तरीही तिने सर्जरी करून आपल्या चेहर्‍याची अशी अवस्था करून घेतली आहे. अनॅस्ताशिया पोक्रेशचुक असे तिचे नाव. माझे गाल हे जगातील सर्वात मोठे गाल आहेत, असे आता ती अभिमानाने सांगते! असे गाल बनवण्यासाठी तिने कॉस्मेटिक सर्जरी करून घेतल्या होत्या. 32 वर्षांच्या अ‍ॅनास्ताशियाला हे रूपांतर घडवून आणण्यासाठी सहा वर्षे लागली. त्यासाठी तिने दीड लाख रुपयांपेक्षाही अधिक खर्च केला आहे. तिने आपले ओठही मोठे करून घेतले आहेत. केसांना गडद गुलाबी रंग देऊन तिने ‘कोण होतीस तू, काय झालीस तू?’ असे विचारण्याइतका बदल स्वतःमध्ये घडवून आणला आहे!


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.