Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ०७, २०२१

साक्षगंध आटोपले; हळद लागण्याआधी तिची आत्महत्या



वडिलांच्या आत्महत्या नंतर लग्नाच्या एक महिन्याआधीच मुलीने संपवली स्वतःची जीवनयात्रा

◼️अतिशय दुखत धक्कादायक घटना


 शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) 

    सद्ध्या आत्महत्त्या करण्याचे सत्र सर्वत्र सुरू असून जिल्ह्यातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सोबतच मुले मुली आत्महत्त्या करीत असल्याने हा प्रकार नेमका कशामुळे घडत आहे. हे समजायला मार्ग नसून  भद्रावती तालुक्यातील कान्सा येथील २२ वर्षीय कुमारिकेने लग्नाला एक महिना शिल्लक असताना स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची अतिशय दुःखद घटना शुक्रवारी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नीलिमा प्रमोद काकडे (रा.कान्सा) असे आत्महत्या करणाऱ्या कुमारिकेचे नाव असून काही दिवसांपूर्वी नीलिमाचे साक्षगंध झाले होते. एका महिन्यावर लग्न आले असताना तिने राहत्या घरीच स्वत: जाळून घेतले.  प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या आकस्मिक आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी १० वर्षांपूर्वी वडील प्रमोद काकडे यांनी सुद्धा कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली होती.  शिवाय पाच वर्षापूर्वी अपघातात भावाचा सुद्धा मृत्यू झाला होता. आणि आता आई ही आपल्या एकुलत्या एक पोरीचा आधार घेऊन कशीबशी मजुरी करून जगत असताना पोरीने सुद्धा आत्महत्या केली असल्याने त्या आईच्या काळजाची काय अवस्था झाली असेल? हे न बोललेच बरे, मात्र लग्नाच्या बहूल्यावर चढण्याच्या अगदी एक महिन्या अगोदर मुलीने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करणे म्हणजे काहीतरी मोठं संकट त्या मुलीवर कोसळल असाव अशी शक्यता असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.