Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७

चंद्रपुरात भव्य किल्ला महोत्सव स्पर्धा 2017 चे आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर व सह्याद्री प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्र्पुर येथे भव्य किल्ला महोत्सव स्पर्धा 2017 चे आयोजन दिनांक 18, 19 व 20 नोव्हेंबर 2017 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत वर्ग 7 वी ते 9 वी चे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात , तसेच या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु. 3000/ रोख दुसरे पारितोषिक 2000/रोख आणि तृतीय पारितोषिक रु.1000/- रोख असे असणार आहे. या स्पर्धेत शाळकरी मुले-मुली भाग घेऊन त्यांची किल्ले बांधणीचे कौशल्य सादर करू शकतात. आयोजकातर्फे माती आणि पाणीचे नियोजन केले जाईल.


या स्पर्धेत विद्यार्थी किल्ला बांधून त्या किल्ल्याची प्रदर्शनी दिनांक 20 नोव्हेंबर  2017 रोजी कोहिनुर पटांगणावर केली जाईल. व तिथे स्पर्धेचे पारितोषिक जाहीर केले जाईल.

तसेच स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेत विद्यार्थी नोंदणी करण्याकरिता प्रत्येक ग्रुप समूहाला 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

हे शुल्क दिनांक 16 नोव्हेंबर  2017 पर्यंत भरावे. चंद्रपूर शहरातील विद्यार्थ्यांनी या किल्ला महोत्सव स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. अंजली घोटेकर, महानगरपालिका आयुक्त श्री संजय काकडे तसेच सह्याद्री प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप रिंगणे - ९१५८३६६८६६, जिल्हा सचिव संजय अनेजा ९८५०३५१४१४, तालुका प्रमुख निमेश मानकर ९८२२७२९१५८, संपर्क प्रमुख सचिन आवारी ९१५८९८५१०५, महिला जिल्हा संपर्क प्रमुख किरण भडके८८३०६०६९४६, जिल्हा उपाध्यक्ष अनु घोटेकर९१५८६१०५५१ संपर्क करण्याचे आवाहन प्रसिद्धी प्रमुख प्रकाश हांडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.