Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०८, २०१९

गडकरींचा वचननामा जाहीर;बघा नागपूरला काय मिळणार येत्या काळात

वचननाम्यातील ठळक बाबी
गडकरी साठी इमेज परिणाम
केंद्रीय मंत्री व भाजप-शिवसेना महायुतीचे नागपुरातील उमेदवार नितीन गडकरी यांचा वचननामा जाहीर झाला आहे. यानुसार पुढील पाच वर्षांत नागपुरात नवे वैद्यकीय महाविद्यालय, ‘डिफेन्स मटेरियल’ उत्पादनाचे ‘हब’, ‘रेडिमेड गार्मेंट झोन’, स्वदेशी ‘मॉल’ उभारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. सोबतच नागपूरची विशेष ओळख असलेल्या या ‘सावजी’ जेवणाचे राष्ट्रीय पातळीवर ‘ब्रॅन्डिंग’साठीदेखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

*तेलंगखेडी उद्यानाच्या जागेवर अँग्रो कन्व्हेशन सेंटर उभारणार
* नागपूर रेल्वे स्थानाकासमोरील रस्ता आठपदरी करणार
* अजनी रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करणार
* नागपूर ते काटोल, वर्धा, भंडारा मार्गावर 'ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प सुरु करणार
* शहराला अपघात मुक्त शहर करणार
* 'आरेंज सिटी स्ट्रीट विकसित करणार
वचननाम्यामध्ये सर्वाधिक भर हा पायाभूत सुविधांचा विकास व रोजगार निर्मितीवर
पोल्ट्री फीड 
* खासदार क्रीडा महोत्सवाची व्याप्ती वाढविणार
*शहरातील खेळांची 300 मैदाने विकसित करणार
* अंबाझच्या २५०० क्षमतेचे खुले स्टेडियम उभारणार त्याला माजी मुख्यमंत्री  वसंतराव नाईक यांचे नाव देणार *योजनासाठी सहाही मतदारसंघात किमान दोन अशी एकूण १२ सभागृहे बांधणार

* शहरातील बसस्थानक आधुनिक बनवणार
* शहराबाहेरील सर्व दिशांनी खासगी -सार्वजनिक बस डेपा उभारण्याचा प्रयत्न करणार
* अनेक जुन्या रस्त्यांचे रु॑दीकरण करणार
* शहरातील तलावांचे सौंदर्यीकरण करणार
* फुटाळा तलावात जागतिक दर्जाचे' मुजीकल फाऊंटन' उभारणार
* धोबी समाजाला गॅसवरील इस्त्री उपलब्ध करुन देणार
* पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात एक लाख घरे बांधणार
* नागपूर-रामटेक मार्गावर १00 हेक्‍टर जागेवर सिल्पग्नाम उभारणार
* नागपुरात फिल्मसिटी उभारणार
* नागनदीचे सॉंदर्यीकरण करणार
* दरवर्षी खासदार पुस्तक मेळाव्याचे आयोजन  शहरात १५ ठिकाणी
* भाजी, मांस, मटण, प्रासळी विक्रेत्यांसाठी वातानुकूलित मार्केट उभारण्याचा प्रयत्न
* शहरातून गुन्हेगारांना हद्दपार करणार

पोल्ट्री फीड 
* वर्दळीच्या ठिकाणी पीपीपी तत्त्वावर पार्किंग प्लाझा उभारुन पार्किंगची समस्या सोडविणार
* शहराच्या चारही दिशांना ट्रान्सपोर्ट झोन उभारणार, 'ट्रान्सपोर्ट' नगर उभारुन ट्रक दुरुस्तीसह विविध सुविधा देणार
* विणकरांसाठी शहरात 'क्लस्टर' तयार करणार
*समृद्धी महामार्गाच्या बाजूला 'एनएमआरडी' योजनेतून लॉजिस्टिक पार्क' उभारणार
*शहरात कौशल्य विकास केंद्र तसेच अत्याधुनिक रोजगार मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येईल. 
*मिहानमध्ये गुंतवणूक आणून उद्योगधंदे वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल
*नागपुरातील तरुणाईला रोजगार मिळेल यावर लक्ष देण्यात येईल.
*दरवर्षी किमान ५० हजार तरुण-तरुणींना रोजगार मिळेल.
*बंगळुरु व पुण्याच्या धर्तीवर आयटी पार्क विकसित करण्याचा प्रयत्न असेल.
*तसेच खासदार निधीतून एमपीएससी, युपीएससी परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येईल. 
*पोलीस व सैन्य भरतीसाठी तरुणांना बाराही महिने मार्गदर्शन देणारे विशेष केंद्र स्थापन करण्यात येईल. 
*अनुसूचित जाती-जमाती तसेच मुस्लिम तरुण-तरुणींसाठी कौशल्य विकासांतर्गत विशेष मार्गदर्शन केंद्र उभारून त्यांना रोजगाराभिमुख करण्यात येईल.
पशुखाद्य 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.