Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०८, २०१९

तालुक्यातील कोणतीच पाणी योजना रखडणार नसल्याची ग्वाही: चंद्रकांत पाटील

कराड (प्रतिनिधी) : राजु पिसाळ
माढा लोकसभेतील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अकलूजचे रणजितसिंह मोहिते-पाटील व खटाव तालुक्यातील रणजितसिंह देशमुख यांचा सार्वजनिक, सामजिक व भागासाठीची तळमळीचा इतिहास पाहता या तीन सिंहामुळे माढयातील रणात कमळाची जीत निश्चित होणार असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. 

निमसोड ता. येथील रणजितसिंह देशमुख मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, अध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
महसूलमंत्री पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्न काय समजतात, सहकारातले काय कळते ? सहकार मोडीत काढणार अशा वल्गना सातत्याने विरोधकांच्यातून होत होत्या. मात्र धोरणात्मक निर्णय घेऊन या सरकारने आम्हीही शेतकऱ्यांची मुले आहोत हे सिद्ध करून दाखविले. विरोधकांच्या टीका टिप्पणीने विचलित न होता, सहकार क्षेत्र मजबूत कसे होईल यासाठी प्रयत्न केला. गत पाच वर्षात ऊसासाठी कोणतेही आंदोलने झाले नाहीत. कारण राज्याने केंद्राकडून 2400 कोटी रुपये कर्ज घेतले त्यावर केंद्राने पहिल्या वर्षी व्याज घेतले नाही तर राज्याने चार वर्षे शेतकऱ्यांकडून व्याज घेतले नाही. या प्रश्नावर अटीतटीने मार्ग काढल्याने आज एफआरपी एक रुपयाही राहिला नाही. या भागात कापूस पिकत नसतानाही देखील हरणाई सूतगिरणी कर्जमुक्त झाली. रणजितसिंह देशमुखांचे खटाव-माण तालुक्यातील औद्योगिक प्रकल्प दिशादर्शक असून त्यांचे कार्यही निश्चितच कौतुकास्पद आहे.
माढाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून खटाव-माण तालुक्याच्या उजाड माळरानावर शेतीपाण्यासाठी सक्षम प्रयत्न केले. आज त्याला मुहूर्तमेढ लाभली असून उर्वरित दुष्काळी भागातील तालुक्यांतील शेवटच्या घटकांपर्यत पाणी योजना पोहचवणार अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली. 
प्रास्तविकात रणजितसिंह देशमुख म्हणाले, राजकारणात व उद्योग क्षेत्रात नेहमीच मोलाचे सहकार्य करणारे रणजितसिंह मोहिते-पाटील व उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या बरोबरीने सामाजिक कार्य करीत आलो आहे. विकासाची व्रजमूठ याभागात आणखी घट्ट करावयाची असेल तर भाजपच्या उमेदवाराला निवडून आणणे क्रमप्राप्त आहे. 
यावेळी माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राजुभाई मुलाणी, आभार संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे यांनी मानले. यावेळी उपसरपंच रणधीर जाधव, जितेंद्र पवार, शिवसेनेचे गणेश रसाळ, अनिल पवार, साहेबराव गोडसे, शिवाजीराव पवार आप्पासाहेब गोडसे, शिवाजीराव देशमुख, सत्यवान कांबळे, हणमंत भोसले आदींसह तालुक्यातील गावोगावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन व कार्यक्रते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.