Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १९, २०१९

पत्रकार मारहाण प्रकरण, दोघांना अटक


ब्रम्हपुरी- तालुक्यातील गांगलवाडीचे सकाळचे पत्रकार विनोद चौधरी यांना रेती तस्करांनी मारहाण केल्याप्रकरणी दोन आरोपिंना 18 मार्चला ब्रम्हपुरी पोलिसांनी अटक केली आहे.नंदलाल भर्रे निलज,मिन्नाथ प्रधान वघाळा ता आरमोरी अशी आरोपींची नावे आहेत.
    आठ दिवसापूर्वी प्रधान याची  ट्रॅक्टर अवैध रेतीची वाहतूक करतांना महसुल अधिकार्यांनी निलज बसस्टँडवर पकडली व तहसीलला कारवाई करिता जमा केली होती,  17 मार्च रोजी विनोद चौधरी हे आपल्या ड्रायव्हरसह खरकाडा फाट्यावर मित्राची वाट पाहत पानटपरीवर उभे असताना रेती तस्कर नंदलाल भर्रे निलज व मिन्नाथ प्रधान वघाळा ता.आरमोरी यांनी विनोद चौधरी यांना आमची वाळूची ट्रॅक्टर पकडून दिलास म्हणून अश्लिल शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली . प्रकाराची विनोद चौधरी यांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला रिपोट दिली असता आरोपींवर भांदवी कलम 294, 506 ,323, 34  द्वारे गुन्हा दाखल केला ब्रम्हपुरी ठाणेदार प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार गेडाम यांनी याप्रकरणाची चौकशी करून आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.