Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २०, २०१९

बेघरांच्या चेहऱ्यावर आनंदाचे रंग;शेकडो बेघरांना कपडे वाटप

नागपुर/प्रतिनधी:- 

नागपुर शहराच्या फुटपाथवरील बेघर, निराधारांना निवा-याची चांगली सोय उपलब्ध होवून, त्यांचं जगणं सुसह्य व्हावं, यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातंर्गत नागपुर महानगरपालिका, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शहरी बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री अझीझ शेख तसेच उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात शहराच्या फुटपाथवरील बेघरांना निवारा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे. 

कलर्स ऑफ़ बेनेटन (UCB Brand), क्लॉथ बॉक्स फॉउन्डेशन नागपुर यांनी सामाजिक उपक्रमात सहभाग (सीएसआर) या योजनेंतर्गत नागपुर शहरातील निराधार बेघराना निशुल्क कपडे वाटप करण्यास्तव बेघरांसाठी कार्यरत असलेल्या सह्याद्री संस्थेसोबत समन्वय करार करण्यात आला आहे.

"अन्न, वस्त्र व निवारा" या मानवांच्या मूलभूत गरजा आहे. आज होळीच्या पूर्वसंध्येला शहरी बेघर निवारा, सीताबर्डी नागपुर येथे बेघर नागरिकांना कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ब्रँडेड नवीन कपडे मिळाल्याने यावेळी बेघरांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. त्यांच्या चेहर्‍यावरील द्विगुणित झालेले हास्य, आनंद पाहून उपस्थित सर्वांना सुखद समाधान मिळाले असून भविष्यातही असे सामाजिक ऊपक्रम घेण्याचे बळ सर्वांना मिळाले.

याप्रसंगी बेघर नागरिकांसह समाजभान जपणारे देवेन्द्रकुमार क्षीरसागर, भारत गजभिये, दीपक पसारकर, महेश येड़े यांचेसह USB कंपनी तसेच निवारागृहाचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.