Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १९, २०१९

रक्तदूत प्रकाशभैया नागरकर यांचा सत्कार

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 17 मार्च 2019 रोजी भूमिपुत्र युवा एकता बहुद्देशीय संस्था चंद्रपुरच्या वतीने प्रियदर्शनी सभागृह येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनोजे कुनबी समाज मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.पुरुषोत्तमजी सातपुते तर प्रमुख पाहुने चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री.मनोहरभाऊ पाऊनकर,बाजार समिती सभापती दिनेशभाऊ चोखारे,सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई धानोरकर,उपसभापती रंजितभाऊ डवरे, ईन्सपायर संस्थेचे संचालक श्री.विजयजी बदखल,उमाकांतजी धांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या वेळी रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फॉउंडेशनच्या माध्यमातून निस्वार्थपने जनसामान्यांसाठी सदैव झटनारे प्रकाशभैया नागरकर यांचा शाल,श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फॉउंडेशनच्या माध्यमातून गेली कित्येक दिवसापासून प्रकाशभैया नागरकर तसेच त्यांची टीम गोर गरीब जनतेची रक्तदानच्या माध्यमातून सेवा करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत भव्य जाहिर सत्कार करण्यात आला.

या वेळी प्रकाशभैया नागरकर यांनी आपला सत्कार हा रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून दिवस रात्र समाजाची सेवा करणाऱ्या रक्तदुतांना समर्पित केला. एवढेच नाहीतर त्यांनी आपल्या भाषनात म्हटले की,"निवडलेला रस्ताच जर इमानदारीचा व सुंदर असेल,तर थकुन जाण्याचा प्रश्नच उरत नाही,भले सोबत कुणी असो वा नसो

RMNSF हि टीम नेहमी माझ्या सोबतीला आहे.ज्याप्रमाणे देशाचे सैनिक जनतेच्या सुरक्षेकरिता सीमेवर लढतात त्याचप्रमाणे आपन सुद्धा रक्तदान करुण रुग्नाची सेवा करण्याचे आव्हान प्रकाश भैया नागरकर यांनी आपल्या भाषणातून केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.