Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट ०१, २०२३

कोविडची मदत मिळाली नाही का? आजच संपर्क करा | Coronavirus disease madat COVID-19

कोविड-19 सानुग्रह अनुदान न मिळालेल्या
नागरिकांनी संपर्क करण्याचे आवाहन



चंद्रपूर (Chandrapur), दि. 1 : कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तिच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने 26 नोव्हेंबर 2021 रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार कोविड -19 आजाराने मृत पावलेल्या व्यक्तिच्या जवळच्या नातेवाईकांनी केलेल्या अर्जाची तपासणी करून 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. (World Health Organization Coronavirus disease situation dashboard presents official daily counts of COVID-19 cases )


मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील काही अर्जदारांना कोविड सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. 
 COVID-19 तरी ज्या अर्जदारांना अद्यात सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळाली नाही, त्यांनी आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क करावा. अथवा जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 07172-251597 वर सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव दगडू कुंभार यांनी कळविले आहे. (Coronavirus disease)




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.