चंद्रपुर जिल्यातील 81 गावे हर घर जल घोषीत
जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक घरात नळाव्दारे पाणी
चंद्रपुर (प्रतिनिधी) चंद्रपुर जिल्हयातील 81 गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत गावातील सर्व कुटुंबांना नळाव्दारे शुध्द पाण्याचा पुरवठा नियमित होत असल्याने या गावांना हर घर जल घोषित करण्यात आले आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रति व्यक्ती, प्रतिदिन 55 लिटर शुध्द पाण्याचा पुरवठा करणे हा उदेश आहे. जील्हयातील 1283 गावात योजना सुरु आहेत. यापैकी 216 गावातील योजना पुर्ण झाल्या असुन सघ:स्थितीत 81 गावांची माहीती केंद्र शासनाच्या संकेतस्थाळावर संकेतस्थाळावर ऑनलाईन आलेली असुन ही गावे हर घर जल घेाषित करण्यात आलेली आहेत. तसेच अजुन ज्या गावातील प्रत्येक कुटुंबाला 100% नळ जोडणी पुर्ण होत आहे त्यांना सुध्दा हर घर जल म्हणुन घेाषीत करण्यात येउन ती गावे संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात येत आहेत.
दरम्यान जिल्यातील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात जल जीवन मिशनचे काम दर्जेदार करुन घ्यावे, गावातली प्रत्येक कुटुंबाला नळाव्दारे पुरेसे आणी शुध्द पाणी पुरवठा करावा व गावे हर घर जल घोषीत करुन घ्यावे असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
हर घर झालेली गावे
1.बल्लारपुर-01
2. भद्रावती-02
3. ब्रम्हपुरी-11
4. चंद्रपुर-04
5. चिमुर-10
6. गोंडपींपरी-02
7. कोरपना-04
8.नागभिड-07
9. पोंभुर्णा- 01
10. राजुरा-01
11. सिंदेवाही-05
12. वरोरा -33