Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १९, २०१९

वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी जखमी

मूल/प्रतिनिधी:

 जंगला शेजारी असलेल्या शेतात बैल बांधण्या करीता गेलेल्या एका तरुण शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. वाघाचा हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्याला मूल येथिल उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखम गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथिल जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. जखमी झालेल्या युवकाचे नाव प्रकाश ठाकरे वय 23 असून मूल तालुक्यातील भंजाळी येथिल रहिवासी आहे.

ही घटना आज सकाळी 8 वाजताचे दरम्यान घडली. मूल तालुक्यातील भंजाळी या गावात प्रकाश ठाकरे या शेतकऱ्याचे शेत आहे. शेताला लागून जंगल असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांच्या नेहमीच वावर असतो. आज ता. 19 सकाळी नेहमी प्रमाणे प्रकाश आपल्या शेतात बैल बांधण्याकरीता गेला होता. बैल बांधत असतांना अचानकपणे वाघाने त्याचावर हल्ला केला. बेसावध अवस्थेत वाघाचा हल्ला झाल्याने घाबरलेल्या प्रकाशने आरडाओरड केली. वाघासोबत झालेल्या झटापटीत प्रकाशला गंभीर जखमा झाल्या. प्रकाशचा आरडाओरडमुळे शेजारील शेतात काम करणारे शेतकरी तसेच गावातील नागरिक धाऊन आले.

 त्यामुळे वाघ जंगलात पळून गेला. गावकऱ्यांच्या मदतीने जखमी प्रकाशला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. सदर घटना पोंभूर्णा वनपरीक्षेत्राच्या हद्दीतील आहे. या घटनेमुळे गावक—यांत भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी (घोसरी) पोंभुर्णाचे क्षेत्र साहायक ए.बी.पालीकोंडावार, वनरक्षक जी.एल.आळे उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.