Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १९, २०१९

वरोरा व मूल येथे SDPO नियुक्तीचे आदेश

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image result for पोलीस
जिल्ह्यातील वरोरा व मूल येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या रिक्त झालेल्या जागांवर नियुक्तीचे आदेश सोमवारी निघाले आहे. वरोरा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून नागपूरच्या नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नामदेव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपअधीक्षक रमेश भागवतराव तायवडे यांची नियुक्ती झाली आहे. 

मूल येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. हिरे यांचे काही दिवसांपूर्वीच स्थानांतरण झाले होते. तर वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार हे सेवानिवृत्त झाल्याने दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. सध्या लोकसभा निवडणुकीचा कालावधी असल्यामुळे शासनाने राज्यातील १८ पोलीस उपअधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. यामध्ये वरोरा व मूल येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा समावेश आहे. आदेशातील नियुक्तीच्या ठिकाणी संंबंधित अधिकाऱ्यांना कोणतीही रजा न घेता तत्काळ कार्यभार स्वीकारावा लागणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.