Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १९, २०१९

विशाल मुत्तेमवार कॉंग्रेसचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार

नागपूर/ललित लांजेवार:
गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूर लोकसभा मतदार संघात विद्यमान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस दमदार उमेदवाराच्या शोधत होती.तो दमदार उमेदवार कॉंग्रेस ला सापडला असून माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांना हि जागा देण्यात आली आहे.

याबाबत पक्षश्रेष्ठीकडून मंगळवारी  अधिकृत घोषणा करण्यात आली.  विशाल मुत्तेमवार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रसार व प्रसिद्धी समितीचे सदस्य आहेत. त्यांना यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने चंद्रपूर शहर आपणि जिल्हा प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर त्यांची प्रदेश पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नागपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
विशाल मुत्तेमवार हे स्वयम्‌ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि माय करिअर क्लबचे संस्थापक देखील आहेत युवकांच्या सर्वागीण विकासासाठी त्यांनी नागपूर, चंद्रपूर, अमरावतीसह विदर्भातील विविध जिल्ह्यात रोजगार संधी, करिअर कोन्सिलिंग, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा देखील राबवीत युवकांच्या अवतीभवती असतात. विशाल मुत्तेमवार यांचे आज रात्री ९ वाजता नागपूर विमानतळावर जंगी स्वागत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.