- Sarpanch of Lakhapur Chandrakala Meshram felicitated by PM Narendra Modi on Independence Day
चंद्रपुर जिल्हयात Chandrapur Gram Panchayat जल जीवन मिशन अंतर्गत कामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली असून त्या गावात प्रत्येक घरी नळाव्दारे पाणी पोहचले आहे. जिल्हयातील अनेक गावे हर घर जल घोषित झालेली आहेत. अनेक ठिकाणी त्या गावातील सरपंच किंवा तेथील ग्रामपंचायत सदस्य समिती, स्वयं सहायता बचत गट यांनी चांगले काम केले आहे.
Grampanchayat 'या' गावाने केली कमाल
केंद्र शासनाने चंद्रपुर जिल्हयातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम (Chandrakala Meshram) यांनी, जलजीवन मिशन योजनेमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेतली आहे. 15 ऑगष्ट रोजी दिल्ली येथे होणा-या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सरपंच चंद्रकला मेश्राम आणी त्यांचे पती यांना उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण केंद्र शासनाकडून देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नुतन सावंत यांना महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे.
LATEST POSTS
Independence Day : चंद्रपूरच्या महिला सरपंचाचा देशात डंका
चंद्रकला मेश्राम यांच्या निवडीबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. चंद्रपुर जिल्हयातील महिला सरपंच यांचा देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावर सन्मान होणे, ही चंद्रपुर जिल्हयासाठी अभिमानाची बाब आहे. याच पावलावर पाऊल ठेवून इतरांनी प्रेरणा घ्यावी व गावाचा विकास साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.