Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०८, २०१९

लोकसभेसाठी आज सायंकाळी प्रचार संपणार


प्रचार कालावधी संपल्यानंतर बाहेरच्या व्यक्तीने मतदारसंघांमध्ये राहण्यास प्रतिबंध


चंद्रपूर दि 8 एप्रिल : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी प्रचाराची मुदत सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. या मुदतीनंतर ज्यांची मतदार यादीमध्ये नावे नाहीत किंवा अन्य जिल्ह्यातील राजकीय किंवा कोणीही अन्य व्यक्तीने 11 एप्रिल पर्यंत जिल्ह्यामध्ये थांबू नये, अशा सक्त सूचना निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिल्या आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान किंवा मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने या काळामध्ये मतदारसंघात राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील रहिवासी व मतदार यादीमध्ये नाव नसणाऱ्या कुणीही ही निवडणूक प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करू नये, यासाठीही उपाययोजना आखण्यात येते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशा कोणत्याही व्यक्तीवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त असून त्यामुळे आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यासंदर्भातील आदेश आज निर्गमित केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.