Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
रविवार, ऑक्टोबर ०१, २०२३
शनिवार, सप्टेंबर ०२, २०२३
रेती तस्करांमुळे सौंदड येथील बायपास मार्गाची दुर्दशा.
चिचटोला-धानोरी रस्त्याचे काम कासवगतीने.
शुक्रवार, जून ३०, २०२३
आजपासून शाळांमधून विद्यार्थ्यांचा किलबिलाट. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व नवागतांचे जंगी स्वागत.
शुक्रवार, जून ०२, २०२३
कत्तलखान्यात जाणाऱ्या ट्रकची धान वाहून नेणाऱ्या ट्रकला जबर धडक. ट्रक मधे खचाखच भरली होती गाय,बैल.
आज (शुक्रवार दि.२)पहाटे पाच वाजता नवेगावबांध टी पाॅईन्ट, शिवाजी चौकात सदर घटना घडली.
धडक एवढी जोरदार होती की, यामधे धान भरलेला ट्रक ने पलटी खाल्ली यात सुदैवाने कोणालाही गंभीर जखम किंवा जिवीत हानी झाली नाही.जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.घटनास्थळावरून या ट्रक चालक अशफ़ाक शेख व कनड्रायव्हर इरफान रैफ या दोघाना ताब्यात घेवून त्यांवर गुन्हा नोंदवून उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे दाखल करण्यात आले आहे .या घटनेचा गुन्हा नवेगावबांध पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६/२३ अन्वये प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत भा.द.वी.२७९ ,४२७ अन्वये दाखल करण्यात आला आहे.
पहाटेची वेळ असल्याने या चौकात सकाळी सकाळीच फिरायला जाणारांची गर्दी होती.
माहीती मिळताच घटनास्थळावर लगेचच नवेगावबांध चे ठाणेदार संजय पांढरे आपल्या शिपायासह पोहोचून परिस्थिती चा आढावा घेवून जनावरे भरलेला ट्रक पोलीस स्टेशनला लावून गुन्हा दाखल केला आहे. ट्रक मधिल सर्व जणावरे मीनी ट्रक च्या सहाय्याने शासन मान्य ज्ञान फांऊडेशन साकोली च्या गो शाळेत पाठविण्यात आली आहेत .
घटनेची माहीती मिळताच शिवसेना ठाकरे गट चे गोंदिया जिल्हाध्यक्ष शैलेश जयस्वाल, नवेगावबांध चे शाखाप्रमुख मुकेश चाफेकर, घनश्याम कापगते यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशन ला पोहोचून घटनेची माहीती घेवून कतली साठी जाणारी जणांवर सुपरूत नाम्यावर रजिस्टर संस्थे कडे सोपविण्यात यावे,ही मागणी केली परंतु ठाणेदार संजय पांढरे यांनी गुन्हा नोंद करून नियमानुसार सदर जनावरे गोशाळेत पाठविली.
या पुर्वी जणांवर अवैध वाहतूक करनाऱ्यांवर नवेगावबांध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छत्तीसगड कडून देवरी-चिचगड-धाबेपवनी नवेगावबांध हा मार्ग नक्षलप्रभावीत क्षेत्र असल्याने या मार्गावर सदर जणांवर तस्करी करणारे ट्रक हे रात्री बेरात्री सुसाट वाहतूक करतात .अशा सुसाट वाहतुकीवर नवेगावबांध पोलीस ठाण्याचे स.पो.नी.संजय पांढरे याचे कडून कडक कारवाई ची अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.
नवेगावबांध येथिल टी पाॅईन्ट चौकात मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावर दूकाणे थाटली असून,आठवडी बाजार पण भरविण्यात येत आहे. जड वाहतूक या मार्गावर होत असते.सुसाट वेगात जाणारी वाहने अशावेळेस वेळी अशाचप्रकारे मोठी दुर्घटना झाली तर मोठ्याप्रमाणात जिवीत व वीत्त हानी होण्यास वेळ लागणार नाही. या मुळे नाहक लोकांचे बळी जातील,या कडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून बघ्याचीच भुमीका पार पाडत आहे.
गुरुवार, मे २५, २०२३
बीएडी विद्यालयाच्या युगेश्वरी लंजे, मंजुषा नेवारे प्रथम,मुलींनी मारली बाजी. विज्ञान शाखेचा 100% तर कला शाखेचा ९४.२९ % निकाल.
संग्रामे विद्यालयातून उत्पन्न,दिपाली यांनी मारली बाजी. विज्ञान शाखेचा 100% तर कला शाखेचा ९२.००% निकाल.
नवेगावबांध पोलीस ठाणे येथे भरती प्रक्रिया व सत्कार समारंभ संपन्न. गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आयोजन.
गुरुवार, एप्रिल २७, २०२३
हत्तीच्या कळपाने करूझरी येथे केले धान पिकांचे नुकसान
रविवार, मार्च ०५, २०२३
तिडका येथील नळ योजना बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण.पाणीपुरवठा योजना वा-यावर.
मंगळवार, फेब्रुवारी २१, २०२३
आजच्या बारावीच्या इंग्रजी पेपर मध्ये ६ गुणांच्या चुका.विद्यार्थ्यांना सरसकट ६ गुण देण्याची मागणी.
12वीच्या परीक्षेतील पहिला पेपर इंग्रजीचा होता. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पान नंबर 10 वर प्रश्न क्रमांक 3 आणि त्यात उपप्रश्न होते ए 3, ए 4 आणि ए 5 हे प्रश्न सोडवत असताना विद्यार्थी थोडे गोंधळले. कारण, यामध्ये ए 3 आणि ए 5 मध्ये प्रश्नच दिलेला नव्हता. तर ए4 मध्ये कवितेच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्या खाली उत्तर सुद्धा देण्यात आले होते. त्यामुळे या तिन्ही प्रश्नांच्या संदर्भात विद्यार्थ्यामध्ये गोंधळ होता.आता शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. बोर्डाने सांगितले की, या त्रुटी संदर्भात आम्ही लवकरच बैठक घेऊ आणि या लवकरच उत्तर देऊ. तिन्ही प्रश्न हे सहा गुणांचे आहेत त्यामुळे सहा गुणांचा बोनस विद्यार्थ्यांना मिळणार का? याबाबत आता बोर्डाचा निर्णय अपेक्षित आहे.शिक्षण मंडळाने एक पत्रक काढलं आहे.
शनिवार, फेब्रुवारी १८, २०२३
प्रतापगड यात्रेत नवेगावबांध येथील एका महिला भाविकेचा मृत्यू.
नवेगावबांध दि.१८ फेब्रुवारी:-
प्रतापगड यात्रेत महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भगवान श्री शंकराच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या नवेगावबांध येथील एका भाविक महिलेचे दुर्देवी निधन झाले.मृतक महिलेचे नाव प्रभाबाई नीलकंठ कुंभरे (वय ५२वर्षे)असे आहे.यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुखद घटना महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रतापगड यात्रेत घडली.
नवेगावबांध येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नीलकंठ कुंभरे यांच्या पत्नी प्रभाबाई वय ५५ वर्षे यांचे आज प्रतापगड यात्रेत दुःखद निधन झाले. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर त्यांचे दुःखद निधनाने कुंभरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.त्या ग्रामपंचायत सदस्य विजय कुंभरे यांच्या मातोश्री आहेत.ही दुर्दैवी घटना दुपारी ३.०० वाजेच्या दरम्यान घडली. प्रभाबाई यांच्या दुर्देवी निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.यात्रेदरम्यान एखाद्या भाविकांचा मृत्यू व्हावा .ही प्रतापगड यात्रेतील पहिलीच घटना आहे,असे सांगितले जाते. मृतक प्रभा ह्या प्रतापगड यात्रेत सहभागी झाल्या.त्या वर गडावर चढत होत्या. वाटेत त्यांच्या लहान मुलाच्या दुकानात विश्रांती घेतली. पुढे प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन शिव मंदिरात श्री भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी जायला निघाल्या त्या उभ्या राहिल्या बरोबर समोर अचानक भोवळ येऊन खाली जमिनीवर कोसळल्या. पडल्या त्यांचा त्याच क्षणी मृत्यूझाला असा अंदाज आहे.प्रतापगड यात्रेत त्या कोसळल्या त्या वेळेस त्याचे जवळ त्याचा लहान मुलगा वैभव सोबत होता.
त्या भोले शंकराचे दर्शन घेण्यासाठी प्राचीन मंदिरात वर टेकडीवर जात असताना, सीतेच्या न्हानीजवळ पोहोचल्या असता,अचानक भोवळ येऊन खाली पडल्या. त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी तसेच यात्रेकरूंनी त्यांना नजीकच असलेल्या आरोग्य विभागाच्या आरोग्य शिबिरात उपचारासाठी नेले. तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतक प्रभा यांना मृत घोषित केले. त्यांचे प्रेत ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. नवेगावबांध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.त्यांच्यावर उद्या दि.१९ फेब्रुवारी रोज रविवारला सकाळी १०.०० वाजता स्थानिक स्मशान घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
शुक्रवार, फेब्रुवारी १७, २०२३
सौंदड गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा.
गुरुवार, फेब्रुवारी १६, २०२३
सावरटोला येथे 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सवाचे भव्य आयोजन.
सौंदड येथे सेवालाल महाराज जयंती साजरी.
बुधवार, फेब्रुवारी १५, २०२३
सौंदड येथे महिला मेळावा व मार्गदर्शन शिबिर संपन्न.
शनिवार, जानेवारी २८, २०२३
पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी येथे वार्षिकोत्सव उत्साहात साजरा
मंगळवार, जानेवारी १७, २०२३
गोंदिया जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील किशोरवयीन मुला- मुलींनी केले क्रीडापर्यटनातून मुंबई दर्शन.गोंदिया पोलीस व एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्पाचा स्तुत्य उपक्रम.
मंगळवार, जानेवारी ०३, २०२३
सावरटोला येथे 3 व 4 जानेवारीला महिला व बालकल्याण प्रशिक्षणाचे आयोजन.
नवेगावबांध दि.२ जानेवारी:-
गट ग्रामपंचायत सावरटोलाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि बालिका दिना निमित्ताने ३ व ४ जानेवारी ला १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत महिला व बालकल्याण प्रशिक्षण,सॅनिटरी नॅपकिन व औषध उपचार या कार्यक्रमाचे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे.
३ जानेवारी रोज मंगळवार ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन अर्जुनी मोर तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कु. पी.एन. किरणापुरे यांच्या शुभहस्ते, ग्रामपंचायत सरपंच युवराज तरोणे यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस पाटील शंकर तरोणे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सरिताताई मेश्राम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डुडेश्वर तरोणे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेश लाडे,ग्रामसेवक एस.के. चिमनकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी १२:३० वाजता बालस्नेही या विषयावर यशदा पुणेच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक रजनीताई रामटेके,गरिबी व उपजीविका या विषयावर यशदाचे राज्यस्तरीय प्रशिक्षक लीलाधरजी पटले दुपारी २.३० ते ३.०० वाजता लिंग समभाव पोषक पंचायत,स्वच्छ आणि हरित पंचायत या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सायंकाळी ७.३० वाजता गावातील बचत गटातील महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मनोहर तरोने, सह उद्घाटक देवराम शिवणकर यांच्या शुभहस्ते, शिरेगाव बांधचे उपसरपंच दादाजी संग्रामे यांच्या अध्यक्षतेखाली, पांडुरंग भोपे,महादेव डोये, रघुनाथ शिवणकर, राधेश्याम तरोणे, थोटूजी मेश्राम,रामगोपाल शिवणकर यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
४ जानेवारी रोज बुधवार ला सकाळी १०.०० वाजता दुसऱ्या सत्राचे उद्घाटन पंचायत समिती अर्जुनी मोरचे सभापती सविताताई कोडापे यांच्या शुभहस्ते,खंडविकास अधिकारी व्ही. आर.निमजे यांच्या अध्यक्षतेखाली, पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे,गटशिक्षणाधिकारी आर.डी.मांढरे,जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे,लायकराम भेंडारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे,पंचायत समिती सदस्य पुष्पलता दृगकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.दुसऱ्या सत्रात स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा या विषयावर यशदा पुणे चे प्रशिक्षक लीलाधर पटले, सुशासनासह पंचायत, जलसमृद्ध पंचायत या विषयावर प्रांजल वाघ सरपंच स्मार्ट ग्राम कढोली, आरोग्यदायी पंचायत, सामाजिक दृष्ट्या न्याय आणि सुरक्षित पंचायत या विषयावर यशदाचे प्रशिक्षक रजनीताई रामटेके मार्गदर्शन करणार आहेत.सायंकाळी ५.०० वाजता अल्पोपहार व सायंकाळी ७.०० वाजता शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन एस. व्ही.बडोले सम्राट अशोक विद्यालय उमरी,सहउदघाटक लोचन शेंडे छत्रपती शिवाजी विद्यालय सावरटोला यांच्या शुभ हस्ते, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील तरोणे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रप्रमुख दिलीप टेंभुर्णे,संजय राऊत,वनरक्षक दुधराम तरोणे,राजाराम तरोणे,राकेश डोये यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाला गावातील सर्व महिला बचत गट,युवक,ग्रामस्थ महिला,पुरुष यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, ग्रामपंचायत सरपंच युवराज तरोणे,उपसरपंच सुवर्णा तरोणे,ग्रामविकास अधिकारी एस के चिमणकर,ग्रामपंचायत सदस्य,महिला ग्राम संघाचे पदाधिकारी यांनी केले आहे.


