संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२५ मे:-
गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या
दादा रोला खिडकी योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली, गोंदिया जिल्हा पोलीस विभाग व गार्डियन सिक्युरिटी अँड फॅसिलिटी हैदराबाद तेलंगणा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २५ मे रोज गुरुवार ला पोलीस ठाणे नवेगावबांध येथे नक्षलग्रस्त भागातील युवकांना रोजगार मिळावा, याकरिता १० वी, १२ वी पास-नापास युवकांसाठी सुरक्षा रक्षक,सुरक्षा सुपरवायझर (सिक्युरिटी गार्ड) या पदासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात ६० युवक सहभागी झाले होते.त्यापैकी १४ युवकांची निवड करून,त्यांना नियुक्तीपत्र यावेळी देण्यात आले. निवड झालेल्या युवकांना रिक्रुटमेंट ऑफिसर गार्डियन ट्रेनिंग अकादमी हैदराबाद तेलंगणा येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पोलीस ठाणे नवेगावबांध तसेच सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनी येथे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी हे विविध सरकारी सेवेत नियुक्त झालेले आहेत.सशस्त्र दुरक्षेत्र पवनीधाबे अंतर्गत नितेश नीलकंठ अमले, दुर्गा संजय रहिले, राजश्री श्रीराम गावड, पोलीस ठाणे नवेगावबांध अंतर्गत रोशनी दीनदयाल बडोले यांचा आत्मविश्वास वाढावा व इतर युवकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता त्यांचा शाल व श्रीफळ देऊन, यावेळी सत्कार करण्यात आला.
सदर मेळाव्यात उपस्थित युवकांना नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे,पोलीस उपनिरीक्षक नागरे,शेख,सिक्युरिटी ऑफिसर कटरे यांनी स्पर्धा परीक्षा,स्किल डेव्हलपमेंट आदि विषयांवर मार्गदर्शन केले.
भरती प्रक्रिया व सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी सहाय्यक फौजदार तुलावी, पोलीस हवालदार मारवाडे, पोलीस शिपाई वाघाये,रुद्रावाड यांनी सहकार्य केले.