बारावीचा निकाल जाहीर : असा आहे बारावीचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा बारावीच्या निकालाचा टक्का घसरला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 91.35 टक्के लागला इतका लागला आहे. गेल्यावर्षी 94.22 टक्के निकाल लागला होता.
यंदाच्या बारावीच्या परीक्षेत दरवर्षी प्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 89.14 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. आज दुपारी 2 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग (96.01 टक्के) अव्वल स्थानी असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (88.13 टक्के) लागला आहे.
असा आहे बारावीचा निकाल
*● विज्ञात शाखा :* 96.09 टक्के
*● कला शाखा :* 84.05 टक्के
*● वानिज्य शाखा :* 90.42 टक्के
*● व्यवसाय शाखा :* 89.25 टक्के
🧐 निकाल 'येथे' पाहता येणार :
💬 SMS द्वारे पाहता येणार निकाल :
● SMS द्वारे निकाल पाहण्यासाठी मेसेज बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.
● हा मेसेज 57766 या क्रमांकावर मेसेज सेंड करा.
● यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा निकाल दिसेल.