नवेगावबांध दि.२५ मे:-
येथील भागेरथीबाई आत्माराम डोंगरवार विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयाचा ,आज जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक शालांत(इयत्ता१२ वी) परीक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला.तर कला शाखेचा निकाल ९४.२९ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून युगेश्वरी मिनेश शेंडे हिने ४९७ (८२.८३ टक्के) गुण प्राप्त करून , महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे,जयेश मारोती कापगते याने ४२७ (७१.१७ टक्के) तर दर्शना प्रदीप टेंभुर्णे हिने ४२७ (७१.१७ टक्के) गुण प्राप्त करुन द्वितीय स्थान मिळवले आहे.तर सलोनी तुलाराम ठवकर हिने ४२३ (७०.५० टक्के) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
तर कला शाखेतून मंजुषा गोरेलाल नेवारे हिने४६२ (७७ .०० टक्के) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.मीनाक्षी जनार्दन कापगते हिने४३२ (७२.०० टक्के) गुण प्राप्त करुन द्वितीय, तर दिव्या रामलाल करपते ४३० (७१.६७ टक्के) गुण प्राप्त करून तृतीय,तर भाग्यश्री विनायक आदमने व महिमा ताराचंद वलथरे यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला आहे.
विज्ञान शाखेतून ६३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.पैकी प्रथम श्रेणीत१८,द्वितीय श्रेणीत ४४,तृतीय श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेतून ७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम श्रेणीत १८,द्वितीय श्रेणीत ३६,तृतीय श्रेणीत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर ४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य आर.टी. काशिवार,प्रा.एन.व्ही. कापगते, प्रा.अश्विन लांजेवार यांच्यासह, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.