Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे २६, २०२३

रामू तिवारी यांना कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून तात्काळ बडतर्फ करा



जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांची चौकशी करा : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची मागणी
रामु तिवारी यांचे वक्तव्याचा जाहीर निषेध

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांची मागणी

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष राम तिवारी यांनी मागणी केली. या वक्तव्याचा संचालकांकडुन तिव्र निषेध करण्यांत आला. रामु तिवारी यांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदावरून तात्काळ बडतर्फ करा, अशी मागणी करण्यात आली.


जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी त्यांचेवर गोळीबार केलेल्या व पकडलेल्या आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. यामध्ये श्री. रामु तिवारी यांना मिरची लागण्याचे तसेच पोटशूळ उठण्याचे काहीच कारण नाहीं. रामु तिवारी यांनी आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्याऐवजी बँकेच्या सर्व संचालकांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करणे म्हणजे तपास यंत्रणेची दिशाभुल करून ख-या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रकार दिसतो, अशी टीका करण्यात आली.

जिल्हा बँकेत कॉंग्रेस पक्षाचे १५ संचालक मागील २० वर्षापासुन असून रामु तिवारी हे नुकतेच भाजपा मधुन कॉंग्रेस पक्षात आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकविण्याची काहीच गरज नाही असेही संचालकांनी सांगीतले.

जिल्हा बँकेच्या स्थापनेपासून बँकेवर कॉंग्रेसची सत्ता आहे. मागील ३वर्षात संतोषसिंह रावत यांचे अध्यक्षतेखाली बॅकेने लक्षणीय प्रगती केली आहे, आहे यावेळी सांगण्यात आले. यावेळी
उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, डॉ. विजय देवतळे, संदिप गड्डमवार, पांडुरंग जाधव, संजय तोटावार, राजेश रघाताटे, ललित मोटघरे, प्रकाश बन्सोड, निरा देवतळे यांची उपस्थिती होती.


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती आहे. नोकरीवर लावून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांनी लाखो रुपयांची आर्थिक गैरव्यवहार केल्याची चर्चा आहे. त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांनी दिली आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर नुकताच गोळीबार झाला होता. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींनी वेकोलीत नोकरी लावून देण्यासाठी सहा लाख रुपये संतोष रावत यांनी घेतल्याचा आरोप केलेला आहे. मात्र नोकरी लावून न दिल्याने संतापलेल्या या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याचा कबुली जवाब नोंदविला.


या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रितेश तिवारी यांनी सांगितले की, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर भरती होणार होती. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर त्याला स्थगिती आली. नोकर भरतीच्या प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संचालकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याची चर्चा आहे. अनेक बेरोजगार तरुणांनी स्वतः येऊन कैफियत देखील मांडलेली आहे. त्यामुळे संतोष रावत यांच्यासह सर्व संचालकांची नार्कोटेस्ट करून सत्य उघड करावे, जेणेकरून बेरोजगारांची फसवणूक होणार नाही. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून एक निवेदन देखील देण्यात येणार असल्याचे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावरील गोळीबार प्रकरणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचा जिल्हाध्यक्ष राजवीर यादव आणि त्याचा भाऊ अमर यादव याला पोलिसांनी अटक केली. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये नोकरी लावून देण्यासाठी आरोपी राजवीर यादवने संतोष रावत यांना ६ लाख दिले होते आणि हे पैसे परत न केल्याने हा हल्ला केल्याची कबुली आरोपीने दिली

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.