Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २७, २०२३

ब्रह्मपुरीत पशुसंवर्धन, पंचायत विभागांवर नागरिकांचे ताशेरे; कारण जाणून घ्या | BRAHMAPURI PANCHAYAT SAMITI

ब्रह्मपुरीत पशुसंवर्धन, पंचायत विभागांवर नागरिकांचे ताशेरे; कारण जाणून घ्या

ब्रह्मपुरीत पशुसंवर्धन, पंचायत विभागांवर नागरिकांचे ताशेरे; कारण जाणून घ्या 


ग्रामीण विकासाचा संपूर्ण गाडा हाकण्याची जबाबदारी पंचायत समिती विभागाची आहे. मात्र सदोष कार्य प्रणाली व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दिरंगाई धोरण यामुळे ग्रामीण नागरिकांना याचा प्रचंड ना हा त्रास सहन करावा लागत असून अनेकांची कामे रिंग आलेली असल्याची वस्तुस्थिती आज आमसभेत निदर्शनास आली. विकासाचा गाडा हाकणाऱ्यांकडून कर्तव्यात तीळ मात्रही कुचराई नको अशी तंबी देत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरले. तर आयोजित आमसभेत पशुसंवर्धन व पंचायत विभागावर नागरिकांनी प्रचंड ताशेरे ओढले. ( BRAHMAPURI PANCHAYAT SAMITI)


आज ब्रह्मपुरी येथील रुक्मिणी सभागृहात पंचायत समिती ब्रह्मपुरी ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. आयोजित सभेस अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार उषा चव्हाण, गटविकास अधिकारी संजय पुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी घुबडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, महिला काँग्रेस अध्यक्ष मंगला लोणबले, माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, माजी पं. स. सदस्य थाणेश्वर कायरकर, मानापुरे, विलास उरकुडे,सरपंच उमेश धोटे, सोनू नाकतोडे, प्रामुख्याने उपस्थित होते. 

आयोजित वार्षिक साधारण सभेत मागील वर्षी सन 2021-  22  या आर्थिक वर्षाचा कार्य अहवाल वाचन करण्यात आला सोबतच सन 2022 -23 चा अहवाल सादर करताच विविध विभागाच्या कार्यप्रणालीवर सदोषतेचा थपका ठेवत नागरिकांनी आमसभेत तक्रारीचे वादळ निर्माण केले. यावर सभाध्यक्ष माजी मंत्री तथा  आ. विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांनी पशुसंवर्धन विभागाच्या कार्यप्रणाली बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावरून तसेच पंचायत विभागाच्या विकास कामा संदर्भातील अहवाला बाबत दिशाभूल करणारे अहवालपत्रक सादर केल्याने दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सोबतच नागरिकांच्या समस्या आठवडाभरात सोडवा अन्यथा कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल अशी तंबी देखील दिली. ग्रामीण भागात विकासाचा दुवा म्हणून पंचायत समितीची यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. ही जबाबदारी पेलणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने ग्रामीण नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सर्वतोपरी प्रयत्नातून विकासाचा गाडा हाकलत ग्रामीण भागाचा विकास साधावा असे होत नसल्यास कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईतून त्यांना मिळणारे वेतन भत्ते ही थांबवण्यात येईल अशा प्रकार शब्दात माजी मंत्री आमदार वडिटीवर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावले. यावेळी ब्रह्मपुरी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामसेवक व पंचायत समितीचे कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते. ( BRAHMAPURI PANCHAYAT SAMITI)


ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील शेतकरी मेघश्याम आंबोरकर यांची दुधाळू गाय पशुसंवर्धन विभागाच्या निष्काळजीपणाची बळी ठरली. आज आमसभेत हे प्रकरण चांगलेच गाजले. तर शेतकरी मेघश्याम आंबोरकर यांनी प्रश्न उपस्थित केला असता पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. यात मेंडकी येथील पशुसंवर्धन विभागाचे पर्यवेक्षक राजहंस मेश्राम यांच्या निष्काळजीपणा व सदोष कार्यप्रणाली यावर ठपका ठेवत वेतन वाढ रोखण्यात चे आदेश सभाध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी दिले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.