Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २७, २०२३

ठाकरे पितापुत्राला डॉ.अनिल बोंडे यांचा खडा सवाल Dr. Anil Bonde

 विर सावरकारांच्या अपमानाचा मुद्दा पेटला

ठाकरे पितापुत्राला डॉ.अनिल बोंडे यांचा खडा सवाल


नागपूर‍, दि.27 मार्च
स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मनीशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला पहिला जोडा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मारला, आता राहूल गांधी यांनी विर सावरकरांना पुन्हा ‘माफीविर’ म्हटल्याने राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आक्रमक होत ठाकरे पितापुत्रांना गर्भीत इशारा देत खडा सवाल केलाय. उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यामध्ये हिंमत आहे का, राहूल गांधी यांना जोड्याने बडविण्याची असा सवाल त्यांनी केला आहे.

काँग्रेसचे माजी खासदार राहूल गांधी यांनी पुन्हा विर सावरकर यांना माफीवर म्हटल्याने देशातील वातावरण चांगलेच पेटल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आक्रमक होत यविषयार सोमवारी (ता.27) भाष्य केले आहे. ते म्हणाले, काँग्रेसच्या मनीशंकर अय्यर यांनी वि.दा.सावरकर यांचा अपमान केला होता. तेव्हा अय्यर यांच्या पुतळ्याला पहिला जोडा बाळासाहेब ठाकरे यांनी लगावला होता. आता काँग्रेसच्या राहूल गांधी यांनी सावरकरांना पुन्हा माफिवीर म्हटले आहे. त्यामुळे डॉ.अनिल बोंडे यांनी बाळासाहेबांच्या त्या कृतीचा संदर्भ व टाईम्स आॅफ इंडियाच्या वृत्ताचा हवाला देत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पुत्र आदित्य ठाकरे यांना उद्देशून खडा सवाल केला आहे. ठाकरे पितापुत्रांमध्ये आहे का हिंमत की ते राहूल गांधी यांना जोड्याने बडवतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये जी हिंमत होती ती हिंमत यांनी सत्तेच्या लाचारीपोठी गमावली आहे. देशातील जनता विचारत आहे, ज्या स्वातंत्र्य सैनिकाने अनन्वित अत्याचार सहन केले. त्याच्याबद्दल अपमानास्पद बोलणाऱ्या राहूल गांधी यांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जोडे मारतील का, संजय राऊत तर शेपटी आतमध्ये घेऊन बिळात लपलेलसे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडू जनतेने अपेक्षा सोडल्याची गंभीर टिका देखील डॉ.अनिल बोंडे यांनी करत राहूल गांधी यांच्यासोबत बोलणी करायला जाण्यात काहीही अर्थ नाही, असाही सल्ला त्यांनी दिला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.