नवेगावबांध दि.२ जानेवारी:-
गट ग्रामपंचायत सावरटोलाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि बालिका दिना निमित्ताने ३ व ४ जानेवारी ला १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत महिला व बालकल्याण प्रशिक्षण,सॅनिटरी नॅपकिन व औषध उपचार या कार्यक्रमाचे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे.
३ जानेवारी रोज मंगळवार ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन अर्जुनी मोर तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कु. पी.एन. किरणापुरे यांच्या शुभहस्ते, ग्रामपंचायत सरपंच युवराज तरोणे यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस पाटील शंकर तरोणे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सरिताताई मेश्राम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डुडेश्वर तरोणे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेश लाडे,ग्रामसेवक एस.के. चिमनकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी १२:३० वाजता बालस्नेही या विषयावर यशदा पुणेच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक रजनीताई रामटेके,गरिबी व उपजीविका या विषयावर यशदाचे राज्यस्तरीय प्रशिक्षक लीलाधरजी पटले दुपारी २.३० ते ३.०० वाजता लिंग समभाव पोषक पंचायत,स्वच्छ आणि हरित पंचायत या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सायंकाळी ७.३० वाजता गावातील बचत गटातील महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मनोहर तरोने, सह उद्घाटक देवराम शिवणकर यांच्या शुभहस्ते, शिरेगाव बांधचे उपसरपंच दादाजी संग्रामे यांच्या अध्यक्षतेखाली, पांडुरंग भोपे,महादेव डोये, रघुनाथ शिवणकर, राधेश्याम तरोणे, थोटूजी मेश्राम,रामगोपाल शिवणकर यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
४ जानेवारी रोज बुधवार ला सकाळी १०.०० वाजता दुसऱ्या सत्राचे उद्घाटन पंचायत समिती अर्जुनी मोरचे सभापती सविताताई कोडापे यांच्या शुभहस्ते,खंडविकास अधिकारी व्ही. आर.निमजे यांच्या अध्यक्षतेखाली, पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे,गटशिक्षणाधिकारी आर.डी.मांढरे,जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे,लायकराम भेंडारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे,पंचायत समिती सदस्य पुष्पलता दृगकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.दुसऱ्या सत्रात स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा या विषयावर यशदा पुणे चे प्रशिक्षक लीलाधर पटले, सुशासनासह पंचायत, जलसमृद्ध पंचायत या विषयावर प्रांजल वाघ सरपंच स्मार्ट ग्राम कढोली, आरोग्यदायी पंचायत, सामाजिक दृष्ट्या न्याय आणि सुरक्षित पंचायत या विषयावर यशदाचे प्रशिक्षक रजनीताई रामटेके मार्गदर्शन करणार आहेत.सायंकाळी ५.०० वाजता अल्पोपहार व सायंकाळी ७.०० वाजता शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन एस. व्ही.बडोले सम्राट अशोक विद्यालय उमरी,सहउदघाटक लोचन शेंडे छत्रपती शिवाजी विद्यालय सावरटोला यांच्या शुभ हस्ते, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील तरोणे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रप्रमुख दिलीप टेंभुर्णे,संजय राऊत,वनरक्षक दुधराम तरोणे,राजाराम तरोणे,राकेश डोये यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाला गावातील सर्व महिला बचत गट,युवक,ग्रामस्थ महिला,पुरुष यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, ग्रामपंचायत सरपंच युवराज तरोणे,उपसरपंच सुवर्णा तरोणे,ग्रामविकास अधिकारी एस के चिमणकर,ग्रामपंचायत सदस्य,महिला ग्राम संघाचे पदाधिकारी यांनी केले आहे.