संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.4 मार्च:-
सडक अर्जुनी तालुक्यातील तिडका येथील पाणीपुरवठा योजना बंद पडलीअसल्याने,
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.केंद्र शासनाचे घर घर नळ योजनेंतर्गत नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी घर नळ योजना सुरू करण्यात आली.मात्र तिडका ग्रामवासी शुद्ध पिण्याचे पाण्यापासून वंचित आहेत. तिडका येथील पाणीपुरवठा योजना बंद असून पिण्याचे पाण्यासाठी नागरिकांना विशेष करून महिलांना बोअरवेलवर पाण्यासाठी भांडणे करावे लागत आहे.या गावापासून पंचायत समिती सडक अर्जुनी हाकेच्या अंतरावर असून मागील तीन-चार वर्षांपासून येथील नळ योजना बंद पडली असल्याने दुषित पाणी घ्यावे लागत आहे.या गावची लोकसंख्या दोन हजार असून ग्रामपंचायत मध्ये तीन वार्ड आहेत.सदस्यसंख्या ९ आहे.तिडका येथे सन१९९०मध्ये पाणी पुरवठा योजना अंतर्गत नळाद्वारे पाणी पुरवठा होत असे.पण सन २०१९ मध्ये पाणी पुरवठा योजनेच्या पाणी टाकीचे साहित्य जिर्ण झाल्याने पाणी पुरवठा बंद पडले आहे.सन २०२० मध्ये ग्रामपंचायत ने जि.प.शाळा समोर बोअरवेल खोदून त्यावर पंप बसविले.आणि जून्या घरगुती पाईप लाईनला जोडणी करून गावातील पाणी पुरवठा सुरू केले.पण या पंपाने वार्ड क्रं.१ मधील ४०० लोकांना पाणी पुरवठा होत आहे.वार्ड क्रं.२व३मधील १५००लोकांना बोअरवेल च्या पाण्यावर अवलंबून आहेत.यात माळी,ढिवर, आदिवासी,हलबी या जातीचे लोकांना पंपाचे दुषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. एकिकडे केंद्र व राज्य शासन स्वच्छ गाव व स्वच्छ पाणी घर तेथे नळ ही योजना सन २०१७ पासून राबवित असून ही योजना लोकप्रतिनिधी यांचे भाषणापुरतीच राहिलेली दिसते.तसेच जि.प.व पं.स.येथील अधिका-यांच्या निष्क्रियतेमुळे ६०ते७० टक्के गावांना पिण्याचे पाण्याच्या समस्येशी झुंजावे लागते.वरिष्ठ अधिकारी गावोगावी शुद्ध पाणी पुरवठा पुरवित असल्याचे सांगून स्वत:ची पाठ स्वत:च थोपटत असल्याचे दिसून येते.