'सांगली - बाबा आमटे कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेल्या "आनंदवन' मधील कलावंताचा "स्वरानंदवन' हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन वरोरा (जि. चंद्रपूर) येथील महारोगी सेवा समितीचे सचिव विकासआमटे यांनी केले. 'समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांचे "आनंदवन' सर्व परिचितआहे. जवळपास अडीच हजारांवर कुष्ठरोगी कुटुंब कबिला आनंदवन सांभाळते. तेथे जवळपास सोळाशे रुग्ण कायमस्वरूपी अंथरुणाला खिळून राहिले आहेत. दुर्लक्षित आणि उपेक्षित अशा या कुष्ठरोग्यांमध्ये आत्मसन्मान जागृत करण्यासाठी आनंदवनचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. कुष्ठरोग मुक्त झालेल्यांच्या माध्यमातून 2000 मध्ये स्वरानंदनवन हा वाद्यवृंद कार्यक्रम साकारला. दया नाही तर संधी द्या, असा या कार्यक्रमाचा गाभा आहे. हा केवळ निव्वळ करमणुकीचा कार्यक्रम नाही. अगर निधी उभारण्याचा उपक्रमही नाही. समाजानेच समाजाच्या हितासाठी लढायला हवे. त्यासाठी माणुसकीचा सन्मान करायला शिकवणारा हा कार्यक्रम आहे. विकलांगाच्या या चमूने आत्तापर्यंत हजारावर प्रयोग केले आहेत. जात, धर्म, पंथ या पलीकडे मानव धर्माचे स्वरूप मांडणारा हा कार्यक्रम समाजाच्या सर्व स्तरापर्यंत जावा हा मूळ उद्देश आहे. त्यासाठी पुढे यावे.'' ते म्हणाले, 'जवळपास दीडशे कलाकारांचे पथक आहे. त्यात अंध, अपंग, मूक-बधिर आणि रोगमुक्त झालेले कलावंत आहेत. या कार्यक्रमाच्या निधीतून पाचशे घरांचे हिम्मतग्राम (कलाकारांचे ग्राम), शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसन तसेच अद्ययावत सुविधा उभारण्यात येणार आहेत. चार सुसज्ज वाहनांसह हा ताफा सांगलीतयेऊ शकते. परिसरातील नागरिकांनी, संस्थांनी पुढाकार घेऊन चार-पाच कार्यक्रम आयोजित करावेत. त्यातून उभा राहणारा निधी या कामासाठी द्यावा.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, ऑगस्ट ०७, २०१३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments