चंद्रपूर, : दुष्काळी पॅकेजच्या धर्तीवर विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष पॅकेज राज्य शासनाने द्यावे, अशी मगणी केली. जी मदत शासनाने जाहीर केली, ती अतिशय तुटपुंजी असल्याची टीकाही त्यांनी केली. सोबतच पालकमंत्री संजय देवतळे यांच्या पाहणी दौèयात झालेल्या निरपराध लोकांवरील लाठीमराच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनाम घ्यावा, असे शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते दिवाकर रावते म्हणाले.
अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. खासगी मलमत्तेसह सार्वजनिक मलमत्तेचेही मोठे नुकसान झाले. या पाश्र्वभूमीवर सेना नेते दिवाकर रावते यांनी मंगळवारी चंद्रपुरातील काही पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. लोकांशी संवाद साधला. यानंतर घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी
यावेळी त्यांनी पालकमंत्री संजय देवतळे यांच्या राजीनाम्याचीही मगणी केली. देवतळे हे चंद्रपूरच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करीत असताना मगील रविवारी त्यांच्या ताफ्यावर पूरग्रस्तांनी दगडङ्केक केली होती. त्यानंतर पोलिसांनी अमनुषपणे लोकांवर लाठीमर केला. या प्रकाराचा रावते यांनी निषेध केला. पालकमंत्र्यांनी पुराच्यावेळी जिल्ह्यात ठाण मांडून बसायला हवे होते. पण, ते कुठेच दिसले नाही. त्यामुळेच लोकांचा संताप वाढला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी देवतळे यांचा पालकमंत्रिपदाचा राजीनाम घेतला पाहिजे, अशी मगणी त्यांनी केली. यावेळी रावते यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन मदतकार्याची महिती घेतली. पण, ही मदत अजूनही पोहोचली नसल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे आता रावते शासनाच्या विरोधात कोणती भूमिका घेतात, याकडे पूरग्रस्तांच्या नजरा लागल्या आहेत. मित्र पक्ष भाजपसोबतची युती ही qहदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. भाजप जर विदर्भाचे आंदोलन करीत असेल, तर ती त्यांची भूमिका आहे. ते स्वतंत्र आहेत. मत्र, युतीचे शासन सत्तेवर आल्यास विदर्भाचा असा विकास करू की, भाजपसुद्धा वेगळ्या विदर्भाची मगणी सोडून देईल, असे रावते म्हणाले. पत्रपरिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळू धानोरकर, रमेश देशमुख, चंद्रपूरचे उपमहापौर संदीप आवारी, दीपक कपूर, अजय स्वामी, रमेश तिवारी उपस्थित होते.