शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: दि.१ जुलै २०२१ रोजी कृषि संजीवनी मोहीम समारोप व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांचे जयंतीनिमित्त कृषिदिन कार्यक्रम आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे प्रमुख उपस्थितीत वरोरा तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रवींद्र धोपटे सभापती पं.स.वरोरा, संजविनी भोयर उपसभापती पं.स.वरोरा, सुनंदा जीवतोडे, सदस्य जि.प.चंद्रपूर, कार्यकर्ते व गावकरी
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेअंतर्गत उभारलेल्या मौजा गावशेत रिठ येथील कु. दिपाली डागाजी बुरिले व मौजा आजनगाव येथील सौ. सोनाली विठ्ठल हटवार यांच्या रोपवाटीकांचे रीतसर उदघाटन केले व परिसरातील पिक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.
त्यानंतर मौजा कोंढाला येथे आयोजित कृषि संजीवनी मोहीम समोरोप व कृषि दिन कार्यक्रमात पिक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचे सत्कार व सन्मान केले. कृषि दिन कार्यक्रमात कृषि महाविद्यालयातील तज्ञ मंडळींनी तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच उपविभागीय कृषि अधिकारी जाधव सर व तालुका कृषि अधिकारी प्रकाश सर यांनी शेतकऱ्यांना संबोधित करून मार्गदर्शन केले.
वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक, पंचायत समिती चे विस्तार अधिकारी व कृषि अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.