Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

भद्रावती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भद्रावती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै ०२, २०२३

वडिलाने पेन्शनचे पैसे न दिल्याने उचलले हे पाऊल

वडिलाने पेन्शनचे पैसे न दिल्याने उचलले हे पाऊल


शिरीष उगे ( भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती : बापाने आपल्या पेन्शन मधील पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात मुलाने आपल्या बापाला मोगरी व दगडाच्या सहाय्याने जीवनाशी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भद्रावती शहरातील अहिल्यादेवी नगर येथे दि. १ रोज शनिवारला घडली. या घटनेत वडील गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी प्रथम शहरातील ग्रामीण रुग्णालयात व नंतर चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी सुरज गुलाब दाते याला अटक केली आहे.

गुलाब लक्ष्मण दाते वय 72 वर्षे हे भद्रावती शहरातील अहिल्यादेवी नगरात राहतात. त्यांचा मुलगा सुरज दाते हा त्यांना नेहमी पेन्शनचे पैसे मागायचा मात्र त्याचे वडील गुलाब दाते हे त्याला पेन्शनचे पैसे देण्यास नकार देत होते. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. घटनेच्या दिवशी आरोपी सुरज दाते याने आपले वडील गुलाब दाते यांना पेन्शनचे पैसे मागितले असता त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर गुलाब दाते हे झोपून असताना मुलगा सुरज याने लाकडी मोगरी व दगडाच्या साह्याने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सुरज दिते याला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२

आगामी उत्सव शांततेत साजरे करण्याकरिता शांतता कमिटीची बैठक

आगामी उत्सव शांततेत साजरे करण्याकरिता शांतता कमिटीची बैठक

शिरीष उगे (तालुका प्रतिनिधी)
भद्रावती :- आगामी सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडावे याकरिता पोलीस स्टेशन भद्रावती येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला तहसीलदार अनिकेत सोनवणे, ठाणेदार गोपाल भारती, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपमुख्य अधिकारी जगदीश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अमोल कोल्हे, सुरज गावंडे, प्रफुल चटकी, खेमचंद हरियानी, विनय बोधी डोंगरे, जयदेव खाडे, मुनाज शेख , विशाल बोरकर, अमित नगराळे, पवन हुरकट,शंकर मून, रोहन कुटेमाटे, डॉ शकील शेख महावितरण चे प्रतिनिधी , पत्रकारानं तर्फे पी .जे. टोंगे, विवेक सरपटवर, विनायक येसेकर, संदिप जिवने, दिलीप मांढरे, राजू गैनवार, यांच्यासह शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
या महिन्यात गांधी जयंती, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ईद यासोबतच इतर शासकीय व धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडावे याकरिता उत्सवा दरम्यान शहरातील ट्राफिक सुरडीत ठेवणे, बुधवार ला होणारे आठवडी बाजारातील रस्त्यांवर लागणारे हाथ रिक्षे नियंत्रित ठेवावे, शोभा यात्रांना अडथळा होऊनये याकरिता लोंबकडलेले विजेचे व दूरचित्रवाहिन्यांचे तार व्यवस्तीत करावे तसेच बाहेरील कोणी अनोळखी व्यक्ती या होनाऱ्या उत्सवात येऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल अश्यांची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात यावी अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्या यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

सोमवार, ऑगस्ट ०८, २०२२

आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणी महिला आयोगाने घेतली तातडीने दखल

आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणी महिला आयोगाने घेतली तातडीने दखल

आश्रमशाळेच्या ५३ वर्षीय अधीक्षकाने केला आठवीतील विद्यार्थिनीवर बलात्‍कार |


भद्रावती (जि. चंद्रपूर) (khabarbat Chandrapur ) । तालुक्यातील बरांज तांडा येथील गमाबाई निवासी आश्रम शाळेच्या ५३ वर्षीय अधीक्षकाला आठवीतील विद्यार्थिनीवर बलात्‍कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण भद्रावती (Bhadrawati) पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र गांभीर्य लक्षात न घेता संस्थाचालक प्रकरण दडपू पाहत होते. हे धक्कादायक प्रकरण हिंगणघाट पोलीस (Hinganghat Police)ठाण्यात पोहोचल्यावर रविवारी उघडकीस आले. दरम्यान या घटनेची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी घेतली असून तातडीने कारवाई करून अहवाल पाठवण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना (Police Chandrapur) दिलेले आहेत.

मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी तातडीने दखल घेऊन पोलीस अधिकारी यांना पत्र पाठवले आहे.



पीडितेचे पालक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. काही महिन्यांपूर्वी ते हिंगणघाट शहरात राहायला आले. त्यांनी आपल्या १३ वर्षीय मुलीला गमाबाई निवासी आश्रमशाळेत शिकण्यासाठी पाठवले होते. काहीच दिवसांत मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे सांगून शाळा प्रशासनाने तिला परत घेऊन जाण्याची सूचना पालकांना केली. त्यामुळे मुलीला घेऊन पालक त्याच दिवशी हिंगणघाटला आले. घरमालकीनीने मुलीला प्रकृतीबाबत सहज विचारणा केली. त्‍यातून मुलीसोबत काही तरी अनुचित प्रकार घडल्याचे त्‍यांच्या लक्षात आले. त्यानंतर हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठण्यात आले. Shashkiy Ashram Shala


तक्रारीनंतर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी ३७६ व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करत इटनकर यास अटक केली. घटनास्थळ चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे हे प्रकरण वळवण्यात आले आहे. दरम्यान, आमदार समीर कुणावार (Samir Kunawar) यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्‍हणत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.





भद्रावती, महाराष्ट्र, भारत

rape victim

rape statistics in india

गुरुवार, ऑगस्ट ०४, २०२२

उद्याला लोकनेते अँड मोरेश्वर टेमुर्डे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा व भव्य नागरी सत्कार

उद्याला लोकनेते अँड मोरेश्वर टेमुर्डे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा व भव्य नागरी सत्कार


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
: स्थानीक श्री मंगल कार्यालयात येत्या शुक्रवारी ५ ऑगस्टला महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते ऍड. मोरेश्वर टेमुर्डे यांचा "सहस्रचंद्रदर्शन सोहळा" आयोजित करण्यात आला आहे. योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक - मित्र मंडळ भद्रावती सह शहरातील विविध सामाजिक संस्था एकत्रित येऊन हा सोहळा आयोजित केला आहे.

 शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.सी.एल.थूल (रिटायर चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, मुंबई) राहतील. प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे माजी आमदार तथा शेतकरी नेते मा. पाशा पटेल उपस्थित असतील. तरी या कार्यक्रमाला भद्रावती परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकनेते ऍड मोरेश्वरराव टेमुर्डे साहेब सहस्रचंद्रर्शन सोहळा समितीचे चंद्रकांत गुंडावार, रवींद्र शिंदे, प्रशांत शिंदे, धनराज आस्वले, गिरीश पद्मावार, जयंत टेमुर्डे, पुरुषोत्तम मते, पांडुरंग टोंगे, माधव कौराशे, प्रशांत कारेकर, सुभान सौदागर, नागो बहादे, बाळा पडवे, सुधीर सातपुते, प्रेमदास आस्वले, सुखदेव साठे, विठ्ठल मांडवकर, लक्ष्मण बोढाले, एड. भूपेंद्र रायपुरे, ज्ञानेश्वर डुकरे, विठ्ठल बदखल, अण्णा कुटेमाटे, राजू बोरकर, सुशील देवगडे, विजय सातपुते, भाविक तेलंग, अजय रामटेके, सुषमा शिंदे, सुनिता खंडाळकर, किरण साळवी, मंदा वरखडे, विलास गुंडावार, विलास भिवगडे, डॉ. प्रेमचंद, एड. शेख, बबन शंभळकर, पंढरीनाथ गायकवाड, गुलाब पाकमोडे, डॉ. ज्योति राखुंडे, डॉ प्रकाश तितरे, डॉ.घोसरे यांनी केले आहे.
विज पडून गुराख्याचा मृत्यू तर एक जण जखमी

विज पडून गुराख्याचा मृत्यू तर एक जण जखमी

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

: नगर पालिका क्षेत्रातील व एकात्मिक बरांज खुल्या कोळसा खाणी लगत असलेल्या चिचोर्डी शेत शिवारात पाळीव जनावरे राखत असलेल्या गुराख्यावर अचानक वीज गर्जनेसह अचानक आलेल्या पावसात वीज पडून एका गुराख्याचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना दि.३ ऑगस्टला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

संजय काशिनाथ चालखुरे (५५) रा. बरांज मोकासा असे वीज पडून मृत्यू झालेल्या गुराख्याचे नाव असून विकास डाखरे (२२) रा.बरांज मोकासा असे जखमीचे नाव आहे. हे दोघेही चीचोर्डी शेत शिवारात पाळीव जनावरे राखत होती. अचानक झालेल्या वीज गर्जनेच्या पावसात ही घटना घडली. मृत गुराख्याचे प्रेत उत्तरीय तपासणीस ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. मृतक हा आपल्या आईकडे राहत असून पत्नी सोडचिठठी देऊन गेली. त्यास एक मुलगी असून मागील वर्षी लग्न होऊन आपल्या सासरी आहे. त्याच्या मृत्यूमुळे गावात एकच शोककळा पसरली.