Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ०८, २०२२

आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणी महिला आयोगाने घेतली तातडीने दखल

आश्रमशाळेच्या ५३ वर्षीय अधीक्षकाने केला आठवीतील विद्यार्थिनीवर बलात्‍कार |


भद्रावती (जि. चंद्रपूर) (khabarbat Chandrapur ) । तालुक्यातील बरांज तांडा येथील गमाबाई निवासी आश्रम शाळेच्या ५३ वर्षीय अधीक्षकाला आठवीतील विद्यार्थिनीवर बलात्‍कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण भद्रावती (Bhadrawati) पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र गांभीर्य लक्षात न घेता संस्थाचालक प्रकरण दडपू पाहत होते. हे धक्कादायक प्रकरण हिंगणघाट पोलीस (Hinganghat Police)ठाण्यात पोहोचल्यावर रविवारी उघडकीस आले. दरम्यान या घटनेची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी घेतली असून तातडीने कारवाई करून अहवाल पाठवण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना (Police Chandrapur) दिलेले आहेत.

मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी तातडीने दखल घेऊन पोलीस अधिकारी यांना पत्र पाठवले आहे.



पीडितेचे पालक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. काही महिन्यांपूर्वी ते हिंगणघाट शहरात राहायला आले. त्यांनी आपल्या १३ वर्षीय मुलीला गमाबाई निवासी आश्रमशाळेत शिकण्यासाठी पाठवले होते. काहीच दिवसांत मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे सांगून शाळा प्रशासनाने तिला परत घेऊन जाण्याची सूचना पालकांना केली. त्यामुळे मुलीला घेऊन पालक त्याच दिवशी हिंगणघाटला आले. घरमालकीनीने मुलीला प्रकृतीबाबत सहज विचारणा केली. त्‍यातून मुलीसोबत काही तरी अनुचित प्रकार घडल्याचे त्‍यांच्या लक्षात आले. त्यानंतर हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठण्यात आले. Shashkiy Ashram Shala


तक्रारीनंतर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी ३७६ व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करत इटनकर यास अटक केली. घटनास्थळ चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे हे प्रकरण वळवण्यात आले आहे. दरम्यान, आमदार समीर कुणावार (Samir Kunawar) यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्‍हणत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.





भद्रावती, महाराष्ट्र, भारत

rape victim

rape statistics in india


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.