अवघ्या काही तासात होणार मंत्रिमंडळ विस्तार;
१० ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन
आता १० ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. विधान भवनात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या ३ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात येऊ शकते. १० ऑगस्टपासून अधिवेशन सुरु होईल. ते दोन आठवडे चालवले जाईल. त्यात १०, ११, १२ ऑगस्ट त्यानंतर शनिवारी १३ ऑगस्टलाही कामकाज करण्याचा निर्णय होऊ शकतो. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन १८ ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. राज्य विधीमंडळाचं आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून १८ ऑगस्टपर्यंत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित रहाणं अनिवार्य असल्याचं सचिवालयाच्या कार्यालयीन आदेश पत्रकात स्पष्ट.