Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ०५, २०२३

आर्थिक फसवणूकप्रकरणी नगरसेवकास अटक | financial fraud

जुन्नरचे नगरसेवक अविन फुलपगार यांना अटक



जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर नगरपालिकेचे नगरसेवक अविन फुलपगार यांना आर्थिक फसवणूकीबद्दल अटक केल्याने खळबळ उडाली.financial fraud


याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रशांत पुनाजी कवठे रा.कोपरे यांनी याबत रितसर फिर्याद दिली. आरोपी नगरसेवक अविन विष्णू फुलपगार ,आरोपी अनिल वाल्मिकी रा. जुन्नर व फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे असून जुन्नर शहरातील शिवाजीनगर येथील मिळकत सि.स.नं ५१५६ या जागेवर बांधकाम करुन सदरचे बांधकाम विक्री केल्यानंतर फिर्यादीकडून घेतलेली रक्कम ३०लाख फिर्यादीस परत देण्याचे मान्य करुन रक्कम घेतली होती.




सप्टेंबर २०१५ ते सप्टेंबर २०२२ च्या दरम्यान आरोपीनी फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे.
फिर्यादी यांनी सदर रक्कम अनेक वेळा मागितली असता शिवीगाळ व दमदाटी करुन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याने आरोपी नगरसेवक अविन फुलपगार यास अटक केली .

financial fraud
आरोपी विरोधात भादवि कलम ४१०,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरिक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक मोरडे करत आहेत.
जुन्नर नगपालिकेच्या नगरसेवकास अटक झाल्याने एकच खळबळ उडाली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.