नवेगावबांध दि.२७ जानेवारी:-
रमेश शिक्षण संस्था कुडेगाव द्वारा संचालीत पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी ता-लाखांदूर जि-भंडारा येथे दिनांक-२३ ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले होते. २३ जानेवारी २०२३ ला दुपारी १२ वाजता वार्षिकोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला.याप्रसंगी उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. नरेशजी मेश्राम सचिव र.शि.स. कु., उद्घाटक म्हणून मा.नितीनजी पुगलिया इंडोफॉर्म ट्रॅक्टर अँड इक्विपमेंट नवेगाव बांध,स्वागताध्यक्ष सुनीलभाऊ कापगते उपाध्यक्ष शा. व्य. समिती, तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौ अस्मिताताई लांडगे सरपंचा पिंपळगाव,सौ गीताताई परशुरामकर उपसरपंचा पिंपळगाव, मा मनोजजी बन्सोड,मा संजयजी बन्सोड,मा सुरजजी चचाने,मा देवेन्द्रजी झोडे,मा संजयजी परशुरामकर,मा हिरालाल गजभिये,मा मोतीरामजी कुंभरे,सौ केवणाबाई परशुरामकर, सौ प्रज्ञाताई मेश्राम,मा राजेशजी नाकाडे,मा धनराजजी डोंगरवार, मा उज्वलजी नाकाडे,मा भालचंद्र चुटे मुख्या.,शाळेचे माजी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सत्कारमूर्ती मा काशीरामजी कापगते,मा व्यंकटजी कुंभरे, मा कैलासजी परतेके,मा शालीकजी धोटे उपस्थित होते.सदर उद्घाटन सोहळ्यात चारही सत्कारमूर्तींचा शाल श्रीफळ देऊन प्रमुख अतिथीच्या हस्ते सत्कार केला गेला.सदर कार्यक्रमाला समस्त विद्यार्थी, बहुसंख्य पालक आणि गावकरी उपस्थित होते.
यानंतर प्रमुख अतिथींनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि गावकरी मंडळींना मार्गदर्शन केले.यानंतर सायंकाळी ६ वाजेपासून विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.२४ जानेवारी २०२३ ला दुपारी विद्यार्थ्यांच्या विविध शारीरिक आणि बौद्धिक स्पर्धा पार पडल्या.तसेच सायंकाळी ६ वाजेपासून विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.२५ जानेवारी २०२३ ला सकाळी ११ वाजता महिला मेळावा तसेच महिलांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता यात मा. सविताताई उपरीकर सरपंचा सानगडी, सौ अस्मिताताई लांडगे सरपंचा पिंपळगाव,सौ गीताताई परशुरामकर उपसरपंचा पिंपळगाव यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले आणि दुपारी २ वाजता बक्षीस वितरण सोहळा पार पडला.त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना स्नेहभोजन दिले गेले.सदर वार्षिकोत्सवात मुख्याध्यापक भालचंद्र चुटे यांचा शाळा व्यवस्थापन समिती मार्फत सत्कार केला गेला. तसेच शाळेतील उपक्रमशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांचा ग्रामपंचायत आणि गावकरी यांनी त्यांच्या कार्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री खुशाल डोंगरवार सर ,प्रास्ताविक श्री भालचंद्र चुटे सर आणि आभार प्रदर्शन सुनीलजी कापगते यांनी यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री किशोर शहारे, कु.अनुराधा रंगारी,कु.शिल्पा मेश्राम तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि माता पालक संघाचे श्री दुर्गेश कुडेगावे, श्री कृष्णाजी कोराम, श्री राहुलजी जनबंधु, श्री विनोदजी शहारे, श्री संजयजी बन्सोड,श्री विनोद शहारे,सौ आशा परशुरामकर, सौ सरोज परशुरामकर, सौ वंदना जोशी, सौ प्रियंका परशुरामकर,सौ रिता परतेके,सौ मिनाक्षी गजभिये, सौ हेमलता परशुरामकर, सौ मनीषा परशुरामकर, सौ मोतिका परशुरामकर,सौ रजनी जनबंधु, सौ दुर्गा परशुरामकर, तुळशीराम बागडे, श्री रमेश शहारे,श्री प्रमोद परशुरामकर सौ चंपाबाई बागडे,सौ शेवंताबाई शहारे,समस्त पालक आणि मतापालक तसेच सर्व शालेय मंत्रिमंडळ आणि विद्यार्थी यांनी अथक प्रयत्न केले. अशाप्रकारे वार्षिकोत्सवाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला गेला.