*सहकारी पणन महासंघाच्या आढावा बैठकीत सत्कार*
ब्रम्हपुरी: महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या मुंबई येथे झालेल्या 64 व्या आढावा बैठकीत चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय वामनराव हजारे यांचा सन 2021-22 मधिल कार्यालयीन कामात उत्कृष्ठ काम केल्या बद्दल,उत्कृष्ठ अधिकारी म्हणुन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतिने राज्याचे सहकार मंत्री डॉ. अतुल सावे व सुधाकर तेलंग (भा.प्र.से.) व्यवस्थापकिय संचालक यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.Sanjay Hazare
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या कामकाजासंदर्भात नुकतीच सुधाकर तेलंग (भा.प्र.से.) व्यवस्थापकिय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली 2021 22 या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची६४ वी आढावा बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जगन्नाथ भोसले मार्ग मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट मुंबई येथे पार पडली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री डॉ. अतुल सावे, माजी राज्यमंत्री सतीश पाटील, पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, आबासाहेब काळे, पणन विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे, पणन माजी संचालक मोहन अंधारे, भागवत धस, सर व्यवस्थापक डॉ. अतुल नेरकर, नागपूर जिल्हा पणन अधिकारी राजेश तराळे, सहकारी संस्थांचे पदाधिकारी पणन महासंघातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सभासद, सहकारी संस्थाचे बळकटीकरण, शेतकऱ्यांना रास्त दराने कृषी निविष्ठांचा पुरवठा करणे, नाफेड व भारतीय खाद्य महामंडळाच्यावतीने राज्यात खरेदीचे कामकाज करणे, शेतमाल व कृषी निविष्ठा साठवणुकीसाठी गोदाम उपलब्ध करणे, विविध योजना राबविण्यासंदर्भात आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचा, विक्रमी कडधान्य खरेदी करणाऱ्या खरेदी व्रिकी सहकारी संघांचा, खत विक्री करणाऱ्या संस्थांचा तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात चन्द्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांच्या सन 2021-22 मधिल कार्यालयीन कामकाजाची दखल घेत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने संजय हजारे यांना उत्कृष्ठ अधिकारी म्हणून स्मृतिचिन्ह , प्रशस्तीपत्र श्रीफळ देऊन सत्कार केला . जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Sanjay Hazare chandrapur Maharashtra India