चंद्रपूर (प्रतिनिधी)-
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आणि निवडणूक साक्षरता मंडळाचे सहकार्याने राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. National Voter's Day
नवमतदारांना जागृत करण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्त्व या विषयावरील घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत ९ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम पुरस्कार भाग्यश्री वैद्य , द्वितीय पुरस्कार कु. मयुरी पाझारे तर तृतीय पुरस्कार साहिल सोनटक्के यांना देण्यात आला.
मतदार जागृती काळाची गरज या विषयावर घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत सात प्रशिक्षणार्थांनी भाग घेतला.यात प्रथम पुरस्कार कु. छाया गायकवाड, द्वितीय पुरस्कार संदेश बेसेकर, तृतीय पुरस्कार जाकिर शेख यांना देण्यात आला.
मतदान - राष्ट्रीय कर्तव्य या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत एकूण ३२ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम पुरस्कार बालचंद्र कांबळे, द्वितीय पुरस्कार रितिकेश पाटील, तृतीय पुरस्कार संदेश झाडे यांना देण्यात आला. समारोपीय कार्यक्रमात राज्यघटना आणि मतदारांची कर्तव्ये या विषयावर एड. डॉ. कल्याण कुमार (Lecture by Kalyan Kumar)
यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे होते. प्रास्ताविक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बी. आर. बोढेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी एन.एन. गेडकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गटनिदेशक श्री. शेंडे , सौ. झाडे, सौ. गभणे , निदेशक श्री. घटे, रणदिवे, नाडमवार, रोडे , मार्तिवार, सौ. हेलवडे,कु. डुंबेरे, कु. साखरकर, गोर्लेवार , कु. वाघाडे, कु. माकोडे आदींनी सहकार्य केले.