Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
रविवार, ऑगस्ट २८, २०२२
सोमवार, मार्च ०२, २०२०
महीला व पुरुष गटात नागपूर रेंज पोलीस संघ विजयी
महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा रंगतदार समारोप
उत्तम आदरातिथ्य, नेटके आयोजन, प्रेक्षकांचा जल्लोष
चंद्रपूर दि. २ मार्च - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजीत महापौर चषक कबड्डी सामन्यात महीला व पुरुष या दोन्ही गटात नागपूरचा रेंज पोलीस संघ विजयी झाला आहे. विदर्भातील १६ महिला व ३२ पुरुष कबड्डी चमूंचा सहभागअसलेल्या या स्पर्धेचे अंतिम सामने रोमांचकारी झाले. पुरुष गटात अकोला संघ व नागपूर रेंज पोलीस दरम्यान अंतिम सामना तर महिलांचा अंतिम सामना नागपूर सिटी पोलीस आणि नागपूर रेंज पोलीस या संघात झाला. अत्यंत अटी तटीच्या या दोन्ही रंगतदार सामन्यात रेंज पोलीस नागपूर पुरुष व महिला संघ विजेते ठरले. विजेत्या पुरुष संघाला रोख ८१,००० व व चषक तसेच महिला गटात विजेत्या संघाला ५१,००० रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.
देशी खेळांमधे असणारा रोमांच कसा अंगावर काटे उभे करतो याचं अनोखं दर्शन महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम दिवशी पाहायला मिळाले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी आयोजित कबड्डी स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडतात. यावेळी २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान कबड्डी स्पर्धा विठ्ठल मंदीर व्यायामशाळेच्या पटांगणात प्रेक्षकांच्या उत्साहात पार पडली.
याप्रसंगी वैयक्तिक स्वरूपाचं बक्षिसेही देण्यात आली. वूमन ऑफ द टूर्नामेंट - शाहीन सय्यद रेंज पोलीस नागपूर, वूमन ऑफ द मॅच - कपाली बोरपल्ले सिटी पोलीस नागपूर,उत्कृष्ट चढाई - जितु चौधरी सिटी पोलीस नागपूर, उत्कृष्ट पकड - पूनम मानकर रेंज पोलीस नागपूर, लोकांची आवडती खेळाडू - दीक्षा भिसे सिटी पोलीस, अष्टपैलू खेळाडू - रोशनी भाजीपाले रेंज पोलीस नागपूर, उत्कृष्ट खेळाडू - वैष्णवी ढुसे उमरेड , आवडती खेळाडू - कु. प्रतीक्षा तेलगोटेअकोला.
तर पुरुष गटात मॅन ऑफ द टूर्नामेंट - जीवन विघे रेंज पोलीस नागपूर , मॅन ऑफ द मॅच सचिन मालटे - अकोला, उत्कृष्ट चढाई - कुणाल ठाकूर रेंज पोलीस नागपूर, उत्कृष्ट पकड - महेश वरुडकर, लोकांचा आवडता खेळाडू -आकाश सातरोटे अकोला , अष्टपैलू खेळाडू - शुभम वाघ अकोला, उत्कृष्ट खेळाडू - यश लोखंडे चंद्रपूर, आवडता खेळाडू - प्रज्वल भोयर नागपूर.
याप्रसंगी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहीर यांनी स्वदेशी खेळासाठी आलेल्या तरुणाईचे अभिनंदन केले. खेळाच्या निमित्ताने आलेल्या खेळाडूंनी महापौर चषकाच्या सामन्यांमधे चुरस निर्माण केली आहे. हीच चुरस स्वदेशी खेळांकडे आजच्या पिढीला आकर्षीत करते आहे ही बाब अभिनंदनीय आहे. मनुष्याचे व्यक्तीमत्व घडविण्याचे काम हे क्रीडा क्षेत्र करीत असते. स्पर्धे निमित्त होणार्या खेळामधून मिळणार्या स्फूर्तीमुळे व्यक्तीमत्व विकसित होत असते. अत्यंत आनंददायी वातावरणात या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचे चांगले आयोजन, खेळाडूंची चांगली व्यवस्था केल्याबद्दल मी महानगरपालिकेचे अभिनंदन केले.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, उपस्थित मान्यवर,पदाधिकारी , पंच, निरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलतांना मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार म्हणाल्या की, महापौर चषक सामन्यांचा कबड्डी हा तिसरा टप्पा आहे. कुस्ती बॉडी बिल्डिंग व कबड्डी स्पर्धेला चंद्रपूरकरांनी भरपूर प्रतिसाद दिला. स्पर्धा ही सर्वांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. कबड्डी हा मराठी मातीचा खेळ सून या खेळाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळविली आहे. बौद्धिक व शारीरिक विकास करण्यासाठी हा खेळ खूप उपयोगी असून युवकांनी आपल्या संघाच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठावे. खेळाच्या निमित्तानं एकोपा निर्माण होतो, हा एकोपा सांघीक खेळाने निर्माण होतो. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे आभार मानते. त्यांनी आपल्या जीवनात खेळाच्या माध्यमातून यशस्वी व्हावे व आपल्या देशाचे नाव गौरवीत करावे.
याप्रसंगी जिल्हा परीषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले,उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे, माजी अध्यक्ष जिल्हा परीषद श्री. देवराव भोंगळे, गटनेते श्री. वसंत देशमुख, झोन १ सभापती श्री. प्रशांत चौधरी, सौ. नीतू चौधरी जिल्हा परिषद, श्री. दिलीप रामिडवार, महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक - नगरसेविका, अधिकारी कर्मचारी व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
बुधवार, जानेवारी २९, २०२०
मनपाच्या शालेय क्रीडासत्राला प्रारंभ
महापौरांनी दिला खेळाद्वारे स्वस्थ व मस्त राहण्याचा मूलमंत्र
चंद्रपूर - शरीर स्वाथ्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. विद्यार्थी जीवनात शिस्त, धैर्य, साहस, आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमंध्ये खेळांची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. शालेय क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या होणाऱ्या कौतुकामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रतिभा आहेत त्या उजळून येण्यास मनपाचे शालेय क्रीडासत्र ही एक संधी असल्याचे प्रतिपादन महापौर सौ राखी कंचर्लावार यांनी केले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजीत शालेय क्रीडासत्र २०१९-२० या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.उपस्थीत मनपाच्या ३२ शाळातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या की, खो-खो,कबड्डी या मैदानी खेळांमुळे आपले मातीशी नाते जुळते तसेच बौद्धिक,मानसिक व शारीरीक क्षमता वाढण्यास मदत होते. या वयातच खेळभावना वाढीस लागते. स्पर्धेदरम्यान पंचांनी आपल्या भूमिकेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना जागृत करण्यास मदत करावी. मुलांचा आनंद हाच आपल्या सर्वांचा आनंद आहे. आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात व प्रशासन अधिकारी नागेश नीत यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात मनपाच्या शाळांनी आधुनिकतेची कास धरली आहे. मनपाच्या शाळा, शिक्षक अतिशय चांगले काम करीत आहेत. या शाळकरी मुलांच्या उत्साहाद्वारे आज आपण क्रीडासत्र उत्सवाला प्रारंभ करीत असल्याचे प्रतिपादन महापौर सौ राखी कंचर्लावार यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख अतिथी आयुक्त श्री. संजय काकडे, महिला व बालकल्याण सभापती सौ. शीतल गुरनुले,उपसभापती सौ. चंद्रकला सोयाम, उपायुक्त श्री. गजानन बोकडे, झोन १ सभापती श्री. प्रशांत चौधरी, झोन २ सभापती सौ. कल्पना बागुलकर, झोन ३ सभापती श्री. सुरेश पचारे,नगरसेवक रवी आसवानी, प्रदीप किरमे, अशोक आक्केवार, प्रशासन अधिकारी ( शिक्षण ) श्री. नागेश नीत उपस्थित होते.
याप्रसंगी संबोधित करतांना उपमहापौर व स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे म्हणाले की, मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा याकरिता मनपा क्रीडासत्र दरवर्षी आयोजित करते. आज या क्रीडासत्रात मनपाच्या शाळांमधील ७०० विद्यार्थी दररोज सहभाग घेणार आहेत. मनपा शाळांमधील मुले गरीब घरची आहेत. महानगरपालिका कुठलीही फी न आकारता त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करते आहे. मध्यान्न भोजनाच्या रूपात पोषक आहार विद्यार्थ्यांना दिला जातो. विद्यार्थ्यांमधे बौद्धिक व खेळगुण विकसित करण्यास मनपा शिक्षक प्रयत्नशील आहेत. आयुष्यात लक्ष्य निश्चित असेल तर कुठलीही गोष्ट कठीण नसते. जोड हवी असते जिद्दीची. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिश्रम घ्यावे. उपस्थित विद्यार्थ्यांनी या क्रीडासत्रात जोमाने भाग घ्यावा व खेळभावनेतून आपल्या शाळांचे आपले, आपल्या पालकांचे, शाळेचे नाव लौकिकास आणावे. याप्रसंगी महापौर यांनी खेळाडूंना व उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे यांनी पंचांना शपथ दिली. उदघाटनप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ड्रीलने तसेच विविध नृत्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन अधिकारी श्री. नागेश नीत, प्रमुख कार्यवाह शरद शेंडे यांनी परिश्रम घेतले. संचालन बबिता उईके यांनी केले. कार्यक्रमाला मनपाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सोमवार, जानेवारी २०, २०२०
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
स्पर्धेतून कर्मचाऱ्यांमधील सांघिकता आणि कार्यकुशलता वाढीस लागेल: संचालक (मानव संसाधन) पी .के. गंजू
शनिवार, डिसेंबर ०७, २०१९
महाविद्यालय विसापूर बाॅल बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम
बल्लारपूर: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बाॅल बॅटमिंटन ( मुली ) या स्पर्धेचे आयोजन दिनांक 02 ते 04 डिसेंबर 2019 रोजी राश्ट्रीय षारीरिक षिक्षण महाविद्यालय विसापूरच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध महाविद्यालयांनी सहभाग दर्षविला होता. सदर स्पर्धेत राश्ट्रीय षारीरिक षिक्षण महाविद्यालय विसापूरने अंतिम सामन्यात सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुरला 2-0 अषा गुणाने पराभूत करुन सदर स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम क्रमंाक पटकाविला. या संघाला प्रषिक्षक व मार्गदर्षक म्हणून राश्ट्रीय षारीरिक षिक्षण महाविद्यालय विसापूरचे प्राध्यापक विक्की तुळषीरात पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्षन लाभले होते. या बाॅल बॅडमिंटन मुलींचा संघात अर्षीया राकीब (कर्णधार), श्रृती जिवने, षुभांगी पावाडे, अष्विनी ताटकंटीवार, रुचीता आम्बेकर, पायल वरारकर, टिना वरारकर, प्रणीता समर्थ, प्रगती गोंधुळे व नेहा बसेषंकर या खेडाळुचा समावेष होता.
या संघाच्या यषाबद्दल राश्ट्रीय षारीरिक षिक्षण महाविद्यालय विसापूरचे प्राचार्य डाॅ. दिलीप टिकाराम जयस्वाल षारीरिक षिक्षण विभाग प्रमुख प्रा. विक्की पेटकर, प्रा. षालीनी आंम्बटकर तसेच आदी प्राधापक वृंद व षिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले.
गुरुवार, डिसेंबर ०५, २०१९
भामरागड संघ विजेता तर गडचिरोली संघ उपविजेता
सोमवार, डिसेंबर ०२, २०१९
दवलामेटी(टोली) येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा
शनिवार, नोव्हेंबर ३०, २०१९
आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचा थरार
चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर : आदिवासी समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्या भावी जीवनातील उत्कृष्ट वाटचालीकरिता आणि पारंपरिक कलागुणांच्या संवर्धनाकरिता आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या नागपूर विभागांतर्गत दिनांक 1 डिसेंबर 2019 ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत विभागीय क्रीडा स्पर्धा विज्ञान व चित्रकला प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
आदिवासी विकास विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आज दिनांक 1 डिसेंबर 2019 रोजी जिल्हा पोलीस मैदान बस स्टँड जवळ चंद्रपूर येथे खासदार सुरेश धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद चंद्रपूर चे अध्यक्ष देवराव भोंगळे राहतील. विशेष अतिथी म्हणून महापौर राखी कंचलवार, खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य नागो गाणार, विधानपरिषद सदस्य अनिल सोले, विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किर्तिकुमार भांगडिया, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार ,आमदार प्रतिभाताई धानोरकर, प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समिती अध्यक्ष यशवंत वाघ हे उपस्थित राहतील. प्रमुख अतिथी म्हणून अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपुर डॉ .संदीप राठोड, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मुख्य वनसंरक्षक ए.स.टी रामाराव, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, नागपूर विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी तथा जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित राहतील.
असा असणार उद्घाटन समारंभ
सर्व प्रकल्पातील खेळाडूंचे आकर्षक पथसंचलन होणार असून चंद्रपुर चिमुर, भामरागड ,अहेरी, गडचिरोली, देवरी, भंडारा, नागपूर व वर्धा प्रकल्पाद्वारे त्यांच्या क्षेत्रातील सांस्कृतिक व भौगोलिक वैशिष्ट्यांचे प्रदर्शन आकर्षक देखावे द्वारे केले जाणार आहे. या सोबतच विज्ञान प्रदर्शनी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रीडा स्पर्धांचा थरार
या चार दिवसीय क्रीडा स्पर्धांच्या महासंग्रामाला नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या 9 प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळातील 2300 आदिवासी खेळाडू भाग घेणार असून यामध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, हॅन्ड बॉल या सांघिक तसेच लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे व चालणे इत्यादी वैयक्तिक खेळात आपल्यातील उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करणार आहे. या सर्व प्रकल्पातील खेळाडूंना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करता यावे याकरिता दिनांक 2 व 3 डिसेंबरला सायंकाळी 7 ते 9 या कालावधीत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस मैदान चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
दिनांक 4 डिसेंबर ला होणार क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम
विभागीय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम बुधवार 4 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजित केले आहे. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे असतील तर, प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे उपस्थित राहतील. चंद्रपूरकरांनी या स्पर्धांचा आनंद घ्यावा व खेळाडूंचे उत्साहवर्धन करावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांनी केले आहे.
गुरुवार, नोव्हेंबर २८, २०१९
चंद्रपूरमध्ये होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी तयारीचे निर्देश
चंद्रपूर दि. 28 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत चंद्रपूर येथील पोलीस मैदानावर नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यासाठी आज सर्व संबंधित विभागाच्या प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी घेतली. सर्व विभाग प्रमुख यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पडाव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विभागीय स्पर्धेला 1 ते 4 डिसेंबर दरम्यान सुरुवात होणार आहे. स्पर्धेमध्ये खोखो, हॉलीबॉल, हँडबॉल, तसेच लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे व चालणे आधी खेळांच्या स्पर्धा पार पडणार आहेत. याशिवाय दररोज सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल देखील या वेळी राहणार आहेत. नागपूर विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील 2300 आदिवासी खेळाडू आपल्यातील क्रीडा कौशल्याला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणावरून खेळाडू येणार असून त्यांची राहण्याची, खानपान व्यवस्था, याबाबत यावेळी चर्चा झाली.
रविवार, नोव्हेंबर १७, २०१९
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत श्रीपाद काळे यांना रौप्य पदक
शुक्रवार, मार्च २२, २०१९

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर करण्याचे जिल्ह्यातील खेळाडूंना आवाहन
शनिवार, मार्च ०९, २०१९
कोंढाळीनगरीच्या खेळाडूंना मैदानाची प्रतीक्षा
गाव तिथे खेळाचे मैदान हे राज्य सरकार व केंद्र सरकार चे धोरण आहे. मग!सरकार कुणाचे ही असो किंवा सत्तेत कुणिही असोत . कोंढाळी सारख्या मोठ्या गावात गावातील युवकांना खेळाचे मैदान नाही, गावाला खेळाचे मैदान असावे या करिता कोंढाळी येथील नागरिकांनी व गावातील सर्वच खेळाचे संघटनांनी तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आप आपल्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांना येथील युवकांना खेळाचे मैदान च्या गरजे बाबद अनेकदा मागणीही केली आहे. मात्र या महत्वाच्या मागणी कडे कुणिही प्रामाणिकपणे लक्ष दिले नाही. खरे तर ! राज्य व केंद्र सरकार चे गाव तिथे खेळाचे मैदान हे धोरण आहे. अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दुर्गाप्रसाद पांडे यांनी दिली आहे. कोंढाळी गावाला खेळाचे मैदाना चा प्रश्न निकाली काढण्या साठी या भागातील खासदार, विधानसभा आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थां चे विधान परिषदेचे आमदार, शिक्षक आमदार,तसेच पदवीधर मतदार संघांचे आमदार, व राजकिय पक्षांकडून निर्देशित व राज्यपालांनकडून नियुक्त असे आमदारांनी सहकार्य करावे अशी मागणी केली गेली आहे. कोंढाळी गावची लोकसंख्या 15000चे वर आहे. 11000 मतदार आहेत. या गावचे खेळाडूंनी एके काळी हाॅलिबाॅल-कबड्डी, व क्रिकेट या खेळात आंतर राज्यिय वआंतरराष्ट्रीय नामांकन मिळविले होते. त्या काळात गावाचा एवढा विस्तार नव्हता. गावालगत काही खजगी जागांवर मैदान बनवुन खेळ खेळत राज्य व राज्या बाहेरही गावाचे नाव वाढविले. आता गावाच्या लगत ले-आऊट पडले. यात गावातील युवकांना खेळाचे मैदान मिळेनासे झाले. यातच गावातील युवकांना खेळा करिता जिल्हा परिषदेच्या किंवा खाजगी शाळांचे मैदानावर खेळावे लागतात. या प्रसंगी संबधीत शाळांचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वेळी त्रासदायक होत असते. तरी गावातील ग्राम पंचायत पदाधिकारी , पंचायत समिती सदस्य , जि. प. सदस्यांनी, व गावातील सर्वच खेळाचे संघटनांनी व सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते खासदार व आमदारां कडे येथील खेळाचे मैदाना साठी प्रयत्न करावेत या करिता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या पक्षाचे राजकीय भेदभाव विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. खरे तर आता जे कोणी सत्तेत आहेत त्यांनी या बाबद पुढाकार घेऊन जिल्हाअधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांची जिल्हयाचे पालकमंत्री याचे कडे बैठक लाऊन खेळाचे मैदानाचा प्रश्न निकली निघू शकतो. कोंढाळी ग्रा. प. चे सोनेगाव येथील महामार्गालगत प.ह. 63चे सर्व्हे क्र एक जी जागा ग्रा.प. कोंढाळी ची होती ती तिन हेक्टर जागा 1994साली झुपडपी करिता काही अटी शर्थींवर वन खात्या कडे वर्ग केली होती. आता सरकार ने नवीन नियमानुसार तिन हेक्टर झुडपी जमीन संबधीत ग्रा. प. कडून फेर-फार क्र.23/-12-10-1984,ऊप विभागिय राजस्व अधिकारी काटोल यांचे आदेश क्र. 159 एल एन डी 12-93/94/दिनांक 01-08-1994जमिन महसुल, अधिनियमाच्या 1966चे कलम 13(4)व24प्रमाणे निस्तार रूपांतर हक्क कायम ठेवून वन विभागाकडे हस्तांतरित. ही जागा खरी तर वन खात्याची नव्हती तीला वन खात्याचे कडे हस्तांतरित केली आहे. ती जागा परत ग्रा.प. ला मिळाली तर या जागेवर कृषी शेतकरी व युवा शेतकर्यानां कृषि विषयक अभ्यासक चिकित्सा केंद्र व युवकांना खेळाचे मैदान उपलब्ध होऊ शकते. पण!या करिता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या पक्षाचे राजकीय भेदभाव विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. व पालकमंत्री याचे मार्फत जिल्हाअधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व विभागीय वन अधिकारी, व ग्राम पंचायत पदाधिकारी व गावातील सर्वच राजकिय पदाधिकारी यांनी हा महत्वाचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे उपसरपंच स्वप्नील व्यास रा वि का चे जिल्हाध्यक्ष आकाश गजबे, सैय्यद आसिफ, गुड्डू पठान, शेख इकबाल,अदनान पठान,राजा बेग, गिरडकर, कूणाल भांगे, भूषण चांडक, आसिफ राजदीप सिंह व्यास,वैभव लाड, कनिष्क तिवारी ,आयुष्मान पांडे, तसेच स्थानिय क्रीडा मंडळे यांनी केली आहे.
मंगळवार, मार्च ०५, २०१९
आज भारत- आॅस्ट्रेलिया सामना
नागपूर – व्हिसीए च्या जामठा येथील मैदानावर मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या एक दिवशीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्या दरम्यान संभाव्य देशविघातक क्रुत्य करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी टेरेरिस्ट मोड्युल वर विशेष नजर रोखण्यात आली आहे.
नागपूर अतिरेक्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून टार्गेट आहे.पुलवामा येथे अतिरेक्याव्दारे सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघाती हल्ला करण्यात आल्याच्या घटने नंतर भारताने या पुढे पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळू नये अशी जनतेच्यावतीने मागणी रेटून धरून दबाव वाढविण्यात आला.या पार्श्वभूमीवर अतिरेकी हस्तकाव्दारे अनुचित प्रकार घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही परिस्थिती लक्षात घेता पोलीस व्दारे टेरेरिस्ट मोड्युलवर वाँच ठेवण्यात आला असल्याचे सूत्रानुसार समजते.
अतिरेकी हस्तकाव्दारे काही तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून , लक्ष्यासाठी ब्रेन वाँश करण्यात येते व त्यांचे ग्रुप तयार करुन,नंतर घातपातसाठी वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात येते.याला साधारणतः टेरेरिस्ट मोड्युल संबोधले जाते.पाकिस्तान सोबत भारताने क्रिकेट सामना खेळू नये या विरोधाचे पार्श्वभूमीवर अतिरेकी हस्तकांच्या संभाव्य कारवायांंना प्रतिबंध घालण्यासाठी अतिरेक्यांचे स्लिपर सेल , प्रतिबंधक संघटनेत काम करणाऱ्या आजीमाजी सदस्यांच्या हालचालीचा माग घेण्यात येत असल्याचे समजते. याशिवाय गर्दीत नक्षल्यांवर नजर ठेवण्यासाठी गुप्तहेर पेरण्यात आले असून,गडचिरोली, भंडारा , गोंदिया व अन्य ठिकाणीच्या खुपियांना पाचारण करण्यात आले आहे
सोमवार, फेब्रुवारी १८, २०१९
बाबुपेठ नगिनाबाग येथे ४ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
बाबुपेठ येथील सुसज्ज स्टेडीयमचा तरुणांनी लाभ घ्यावा
चंद्रपूर - काश्मीरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश या प्रसंगी भारतीय सैन्यदलांच्या पाठीशी उभा आहे. आपली देशभक्ती, देशाप्रतीची भावना सदैव जागरूक ठेवा. आपण जे कार्य करतो ते प्रामाणिकपणे करून त्याचा देशाला कसा लाभ होईल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवून त्यांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करायला हवे. भारत मातेच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी सिद्ध होण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत कोट्यावधीच्या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा दि. १७ फेब्रुवारी रोजी मा. पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला. महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान निधीअंतर्गत विविध विकास कामे राबविली जात आहेत, त्या कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा बाबुपेठ स्टेडिअमवर महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता. यात बाबुपेठ येथील सुसज्ज अश्या श्री अटल बिहारी वाजपेयी क्रीडा स्टेडीयमचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नगिनाबाग प्रोफेसर कॉलनी येथील समाजभवन बांधकामाचे व संत कंवरराम चौक ते ईरई नदी पर्यंत पथदिवे लावण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद जवानांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. यावेळी युवकांशी संवाद साधतांना पालकमंत्री यांनी पुलवामा घटनेचा उल्लेख करून त्यांनी सर्वप्रथम शहीद सैनिकांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या. सीमेवर झालेल्या दुर्घटनेनंतर सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा आपला मानस होता मात्र जनतेच्या सुविधांसाठी विकास कार्ये सुरु करणे व ती लवकरात लवकर पूर्ण होतील याची काळजी घेणे, हे देशभक्तीचेच काम आहे. आपले जवान लढत असताना एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी अधिक प्रामाणिकपणे पार पडणे आपले कर्तव्य आहे.
जिल्ह्याचा, शहराचा विकास व्हावा यासाठी आम्ही शक्तीने काम करतो आहे. येत्या दीड वर्षात भव्यदिव्य असे मेडिकल कॉलेज चंद्रपूरला सुरु होणार आहे. टाटा ट्रस्टने दिलेल्या निधीतून २०० कोटीचे टाटा कॅन्सर हॉस्पीटल आपल्या शहरात बनणार आहे. संपूर्ण भारतात केवळ वाराणसी व चंद्रपूर येथेच हे कॅन्सर हॉस्पीटल बनणार आहे. बॉटनीकल गार्डन, स्किल यूनिव्हर्सिटी, वन अकादमी, पोंभुर्ण्यात १०० टन अगरबत्ती बनवण्याचा उद्योग सुरु होतो आहे, चायना कडून आवक करण्याऐवजी आपल्या गावात निर्माण झालेली अगरबत्ती आता आपल्या देवघरात असेल. साधी दातकोरणी सुद्धा आपल्याकडे कोरियाकडून आयात करावी लागायची मात्र ती आता आपल्या देशात बनणार आहे.
बाबुपेठ येथील स्टेडियमचे स्वरूप पाहून हा पूर्वी हागणदारी परिसर म्हणून ओळखला जायचा यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. बाबुपेठ परिसरातील लोकांनी स्टेडियमची व्यवस्थीत काळजी घेतल्यास तरुण खेळाडूंना कुठल्याही सुविधेची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. परिसरात होणाऱ्या विकास कामांकडे या वार्डातील नागरिकांनी देखील आत्मीयतेने लक्ष वेधावे. त्याचा दर्जा उत्तम राखला जातो अथवा नाही याबाबत जागरूक असावे. श्री बजरंग व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या मागणीनुसार शक्ती देवता हनुमानाची भव्य मूर्ती क्रीडांगणात उभारण्यात येणार आहे. सबका साथ सबका विकास या धोरणानुसार स्थानिक रहिवासींच्या हिताला धक्का ना पोहचविता बाबुपेठ उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे
यावेळी उपस्थित युवकांना काश्मीर मध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख करून ते म्हणाले, प्रधानमंत्री यांनी सीमेच्या पलीकडे असणाऱ्या आतंकवादी संघटनांचा खात्मा करण्याचे स्पष्ट केले आहे. सैन्यदल आपले काम चोख बजावेल यावर विश्वास ठेवा .या जिल्ह्यामध्ये १ जुन पासून विसापूर नजीक भारतातील सर्वात सुंदर सैनिक शाळा सुरू होत आहे. या सैनिक शाळेमध्ये बाबुपेठमधील ज्यास्तीत ज्यास्त तरुणांचा प्रवेश होईल अशी बाबुपेठवासीयांकडून अपेक्षा आहे.
मिशन शक्ती लवकरच सुरू होत असून त्या माध्यमातून ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये चंद्रपूरच्या मुलांकडून ऑलिम्पिक पदकाची आपण अपेक्षा करीत आहोत. मिशन मंथन, मिशन सेवा, मिशन सारथी अश्या गेल्या चार वर्षात सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले . बाबुपेठ परिसरातील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
बाबुपेठ परिसरातील कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, वर्ध्याचे आमदार पंकज भोयर, , उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगडे ,स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, , सभागृह नेता वसंत देशमुख, महिला व बालकल्याण सभापती जयश्री जुमडे, झोन १ सभापती माया उईके, झोन १ सभापती स्वामी कनकम, यांच्यासोबतच नगरसेविका नीलम आक्केवार, कल्पना बगुळकर, ज्योती गेडाम, शिलाताई उईके, सहायक आयुक्त विजय देवळीकर, विजय बोरीकर, महेश बारई, अनिल घुमडे, सुहास अलमस्त उपस्थित होते.
रविवार, फेब्रुवारी १७, २०१९
व्हॉलिबॉल राज्य स्पर्धा : यवतमाळ संघाला विजेतेपद

योजना प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचाव्यात - महापौर नंदा जिचकार
नागपूर, ता. १७ : अनेक अडचणींवर मात करून आज दिव्यांग खेळाडू प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आज दिव्यांगासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा प्रत्येक दिव्यांगाला लाभ मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या योजना दिव्यांगांसाठी मोठा आधार आहेत. या योजना प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी नागपूर महानगरपालिका सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
नागपूर महानगरपालिका व पॅरा व्हॉलिबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुभेदार सभागृहात आयोजित महापौर चषक सीनिअर पॅरा सिटींग व्हॉलिबॉल राज्य स्पर्धेचा रविवारी (ता. १७) समारोप झाला. यावेळी महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, स्पर्धेचे संयोजक नगरसेवक दिनेश यादव, पॅरा व्हॉलिबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नामदेवराव बलगर, उपाध्यक्ष राजू दुधनकर, धनंजय उपासनी, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, जितेंद्र गायकवाड उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, दिव्यांग असूनही मैदानात एक खेळाडू म्हणून वावरणा-या प्रत्येक खेळाडूचा उत्साह अनेक दिव्यांगांना प्रेरणा देणारा आहे. प्रत्येक दिव्यांगांनी एका खेळामध्ये तरी पुढे यावे. खेळामुळे व्यक्तीमधील आत्मविश्वास वाढतो व नवी ऊर्जा मिळते. प्रत्येकाने आपल्यातील खेळाडूवृत्ती सदैव जोपासावी, केंद्र, राज्य शासनासह नागपूर महानगरपालिकाही सदैव आपल्या सोबत आहे. दिव्यांग खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्वाचे असून दरवर्षी दिव्यांगांसाठी अशा स्पर्धा व्हाव्यात यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पॅरा व्हॉलिबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नामदेवराव बलगर यांनी तर संचालन असोसिएशनचे सचिव राहुल लेकुरवाळे यांनी केले.
विजेत्या संघाला २५ हजार रूपये पुरस्कारस्पर्धेतील अंतिम सामन्यात यवतमाळ संघाने कोल्हापूर संघाला दोन सेटमध्ये २५-२०ने पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात विजेत्या यवतमाळ संघाकडून देवदास कदमने सर्वाधिक ९ गुण केले तर अनिल पवार (८), दिलीप कांबळे (५), कमलाकर कराळे (४), संतोष घोडके (२) व संतोष रंजने (१) यांनीही संघाच्या विजयात मौलिक योगदान दिले. प्रतिस्पर्धी संघाकडून मितेश हरडेने ७ व छगन गुरनुलेने ६ गुण केले. विजेत्या यवतमाळ संघाला महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते विजयी चषक व २५ हजार रुपये पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर उपविजेत्या कोल्हापूर संघाला चषक व २० हजार रुपये पुरस्कार देण्यात आले. तिस-या स्थानाच्या स्पर्धेत पुणे संघाला २६-२४ अशा दोन सेटमध्ये पराभूत करणा-या अकोला संघाला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय महिला संघाला प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उपांत्य फेरीत यवतमाळ संघाने अकोला संघाला तर कोल्हापूर संघाने पुणे संघाला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेमध्ये राज्यातील १६ जिल्ह्यातील संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेत नागपूर शहर, नागपूर ग्रामिण, अमरावती, अकोला, सातारा,वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नंदुरबार, औरंगाबाद, बुलडाणा, यवतमाळ या १६ जिल्हा संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी सर्व संघांना यावेळी प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.
ऋतुजा जगदाळेला गुणवंत खेळाडू पुरस्कार प्रदान
पुसेसावळी : महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्यामार्फत ऋतुजा दत्तात्रय जगदाळे रा. राजाचे कुर्ले, ता. खटाव, जिल्हा सातारा हिला गुणवंत खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई उपनगर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांच्या हस्ते ऋतुजा जगदाळेला गुणवंत खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऋतुजाने अॅक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक या खेळांच्या प्रकारांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली होती.
तीला योगेश पवार व राहुल ससाने यांनी प्रशिक्षण दिले. याबद्दल तर पूजाचे आमदार बाळासाहेब पाटील , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, जितेंद् पवार, सरपंच समरजित राजे - भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
शुक्रवार, फेब्रुवारी १५, २०१९
प्रलंबित विकास कामांबाबत त्वरित कार्यवाही करा:आ.सुधाकर कोहळे
बैठकीमध्ये आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त अभिजीत बांगर, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेविका स्नेहल बिहारे, मंगला खेकरे, स्वाती आखतकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.
बैठकीमध्ये राजाबाक्षा हनुमान मंदिर सौंदर्यीकरण, रमना मारोती मंदिर सौंदर्यीकरण, बुधवार बाजार येथील विकास कामे, मानेवाडा दहन घाटाचे सौंदर्यीकरण, दक्षिण नागपुरात मनपा अंतर्गत करण्यात आलेले सीमेंट रस्ते, पूर्व बालाजी नगर पंचकमेटी हनुमान मंदिर येथील साऊंड सिस्टीम व तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती, मनपा अंतर्गत दक्षिण नागपुरातील झोपडपट्टी धारकांना पट्टे वितरण, सक्करदरा तलावात मासेमारी करण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविणे, नगरोत्थान येथील उद्यानाच्या निविदा, दक्षिण नागपुरातील दिव्यांगांना बॅटरीवरील ट्रायसिकल मिळणे, सक्करदरा अग्निशमन विभागाच्या रिक्त जागेवर हॉकर्स झोन व पार्किंगची निर्मिती करणे, मोठा ताजबाग व सिंधीबन येथील झोपडपट्टीबाबत, आशीर्वाद नगर इंदिरा गांधी सभागृहात अभ्यासिका सुरू करण्याबाबत, निर्मल नगरी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत, गजानन मंदिर ते प्रोसेस सभागृहादरम्यान रस्ता तयार करणे, म्हाळगी नगर पाण्याची टाकी या विषयांचा आढावा घेण्यात आला.
राजाबाक्षा हनुमान मंदिर, रमना मारोती हनुमान मंदिराच्या सौंदर्यीकरणाबाबत अद्यापही निविदा न निघल्याने यासंदर्भात त्वरित निविदा काढणे, बुधवार बाजार येथील विकास कामांच्या संदर्भातही त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार सुधाकर कोहळे यांनी दिले. मानेवाडा दहनघाट सौंदर्यीकरणाबाबत तात्काळ कार्यवाही करणे, मनपा अंतर्गत दक्षिण नागपुरातील झोपडपट्टी पट्टे वाटपासंदर्भात आवश्यक मार्गदर्शनाचे पत्र तात्काळ शासनाकडे पाठवून नागपूर महानगरपालिकेने पट्टे वाटपासंदर्भात कारवाई करण्याचे आमदार सुधाकर कोहळे यांनी निर्देशित केले.
सक्करदरा परिसरात हॉकर्स झोन व पार्किंगची सुविधा नसल्याने परिसरातील दुकानदारांसह नागरिकांनाही वाहतूक व अन्य त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात सक्करदरा येथील अग्निशमन विभागाच्या रिक्त जागेवर हॉकर्स झोन व पार्किंगची निर्मिती करण्यात यावी यासाठी परिसरातील दुकानदारांनी निवेदन सादर केले. तुकडोजी चौक ते क्रीडा चौकादरम्यान सिमेंट रस्ता, सक्करदरा तलावात मासेमारी करणे व नगरोत्थान येथील उद्यानाच्या निविदा प्रक्रियेबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करणे, लवकरात लवकर दक्षिण नागपूरातील दिव्यांगांना बॅटरीवरील ट्रायसिकल देणे, विद्यार्थ्यांच्या सुविधेच्यादृष्टीने आशीर्वाद नगर इंदिरा गांधी सभागृहात तातडीने अभ्यासिका सुरू करणे यासह सर्वच प्रलंबित मागण्यांसंदर्भात आवश्यक अडचणी दूर करून तातडीने कार्यवाही करून पूर्णत्वास नेण्याचे निर्देश यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
मंगळवार, फेब्रुवारी १२, २०१९
नागरिकांच्या मुलभूत सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करा:चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर/प्रतिनिधी:
पाणी, वीज, गडर लाईन, अतिक्रमण, स्वच्छता, नाल्याच्या समस्यांबाबत नागरिकांना दररोजच त्रास सहन करावा लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
सोमवार, फेब्रुवारी ११, २०१९
महापौर चषक कुस्ती स्पर्धा सोहळ्याचा रंगतदार समारोप
हर्षवर्धन सदगीर चंद्रपूर महापौर चषक कुस्ती स्पर्धेचा अजिंक्यवीर, महिला गटात भाग्यश्री फंड विजयी…
चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा रंगतदार समारोप नाशिकचा हर्षवर्धन सदगीर विरुद्ध मुंबईचा सतीश फडतरे या दमदाररोमांचकारी लढतीने झाला. मॅटवरील कुस्तीत १० फेब्रुवारी रविवारी सायंकाळी झालेल्या खुल्या वजनी गटात मुंबईच्या सतीश फडतरेवर दणदणीत विजय मिळवत हर्षवर्धनसदगीर याने नाशिकसाठी विजेतेपद पटकावले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित केला जाणाऱ्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या लढती मोठ्या जल्लोषात पार पडतात. यावेळी ८ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान कुस्ती स्पर्धा कोहिनूर क्रीडांगण येथे प्रेक्षकांच्या उत्साहात पार पडली. राज्यभरातुन या दोन दिवसीय कुस्ती स्पर्धेसाठी ३०० वर मल्लांनी सहभाग नोंदवला. तर हजारोकुस्तीप्रेमींना रोमांचकारी सामन्यांची पर्वणीच या निमित्ताने अनुभवायला मिळाली.
या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, लातूर, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद तसेच विदर्भातील पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले होते. पुरुष गटात ७०किलो गटात मूंबईचा सर्वेश यादव प्रथम असून ६५ किलो गटात प्रथम लातूरचा महेश तातपुरे, ६१ किलो गटात प्रथम गोविंद कपाटे, ५७ किलो गटात प्रथम राहुल कसारे, ५०किलो गटात प्रथम पंकज पाटील, ४५ किलो गटात प्रथम निखिल चौधरी, ४० किलो गटात प्रथम आकाश गड्डे, ३५ किलो गटात प्रथम अभिजीत ठानगे विजेते ठरले. तर महिलागटात ५३ किलो गटात अहमदनगरची धनश्री फंड विजेती ठरली असून इतर गटात, ४८किलो गटात प्रथम रेश्मा शेख, चंद्रपूर , ४४ किलो गटात प्रथम अंजली शाम, नागपूर, ४० किलो गटात प्रथम प्रियांका भोयर, चंद्रपूर, ३५ किलो गटात प्रथम वृषाली झंझाड, भंडारा विजेते ठरले. पंच म्हणुन आनंद गायकवाड, रणवीरसिंह राहल, रामदास वडीचार, शरद टेकुलवार, छगनदेव पडगेलवार, धर्मशील कातकर, सुहास बनकर, अब्दुल फैझ काजी, नामदेव राऊत, विवेक बुरडकर, कु. शुभांगी मेश्राम, शाम राजूरकर, मुरलीधरटेकुलवार, वैभव पारशिवे, कुणाल वडीचार यांनी काम पाहिले. प्रसंगी उपस्थित मान्यवर,पदाधिकारी , पंच, निरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत विजयी पुरुष मल्लाला महापौर चषक, ७१,००० रुपयांचे रोख पारितोषिक व चांदीची गदा तसेच महिला विजेत्या मल्लाला महापौर चषक ३५,००० रुपयांचे रोखपारितोषिक व चांदीची गदा देण्यात आली. बक्षीस वितरण प्रसंगी महापौर सौ. अंजली घोटेकर म्हणाल्या की, कुस्ती हा मातीचा खेळ असून खेळाच्या माध्यमातून शरीराचाविकास होतो. हा खेळ आरोग्यासाठी खूप उपयोगी असून युवकांनी आपल्या संघाच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठावे. युवकांनी कुस्तीच्या वाढीकरिता ग्रामीण खेळांमध्येरुची निर्माण करावी.कुस्ती हा महाराष्ट्राचा खेळ असून या खेळाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळविली आहे. युवकांमधील कला, क्रिडा या सुप्त गुणांना चालनामिळावी तसेच यासाठी त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उदात्त हेतुने आयोजित महापौर चषक स्पर्धेला चंद्रपूर क्षेत्रातील तरूणाईने दिलेला उदंड प्रतिसाद अतिशयचांगला आहे आहे. खेळांविषयी आवड असलेल्या तरुण मुलां-मुलीं करीता एक चांगले व्यासपीठ निर्माण करून देण्याचे उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेद्वारे खेळाडू आपल्या शहराचे नाव राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणार यात शंका नाही.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे, उपायुक्त श्री. गजानन बोकडे , नोडल अधिकारी श्री. विजय देवळीकर, गटनेते श्री. वसंत देशमुख, भारतीय पारंपरिककुस्ती संघाचे विदर्भ उपाध्यक्ष रघुवीर अहिर, मोहन चौधरी महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक -नगरसेविका, अधिकारी कर्मचारी व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते
शुक्रवार, फेब्रुवारी ०८, २०१९
खंडस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत तेरा समूहसाधन केंद्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या १३ शिक्षकांना शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मान्यवरांची मने जिंकली . प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव ,संचालन सरिता बाजारे व विलास भोतमांगे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी छाया इंगोले यांनी केले.आयोजनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर गुलाब उमाठे, छाया इंगोले, रामराव मडावी, केंद्रप्रमुख शरद भांडारकर, प्रेमा दिघोरे, हेमचंद्र भानारकर, राजेंद्र देशमुख, सीमा फेंडर आदींनी केले.





