Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १७, २०१९

ऋतुजा जगदाळेला गुणवंत खेळाडू पुरस्कार प्रदान

(राजु पिसाळ) कराड 

पुसेसावळी : महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्यामार्फत ऋतुजा दत्तात्रय जगदाळे रा. राजाचे कुर्ले, ता. खटाव, जिल्हा सातारा हिला गुणवंत खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई उपनगर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांच्या हस्ते ऋतुजा जगदाळेला गुणवंत खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऋतुजाने अॅक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक या खेळांच्या प्रकारांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली होती. 
तीला योगेश पवार व राहुल ससाने यांनी प्रशिक्षण दिले. याबद्दल तर पूजाचे आमदार बाळासाहेब पाटील , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, जितेंद् पवार, सरपंच समरजित राजे - भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.