Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १७, २०१९

पुलवामा हल्ल्याच्या निर्षेधात पुसेसावळीत कडकडीत बंद

सकाळपासुनच पुसेसावळीतील बाजारपेठेत शुकशुकाट 


राजु पिसाळ (कराड)
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये आज पुलवामा येथे भारतीय जवानांवरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निर्षेधात पुसेसावळीत उस्फूर्तपणे बंद पाळण्यात आला होता. पुसेसावळीसह परिसरातील गावामध्येही बाजारपेठ बंद होत्या.

तसेच चोराडेतील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने प्रभात फेरी काढुन अमर अमर रहे शहिद जवान अमर रहे, जब तक सुरज चाॅद रहेगा वीर जवानोंका नाम रहेगा अशा घोषणा देऊन पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना जि.प.शाळा पटांगणात श्रद्धांजली वाहिन्यात आली.
त्यामुळे आजच्या दिवशी या भागात शुकशुकाट जाणवत होता, तसेच पुसेसावळी बाजारपेठेतील व्यापारीवर्गाने शंभर टक्के बंदमध्ये सहभाग नोंदवल्यामुळे पुर्ण बाजारपेठेत शुकशुकाट होता.
या भ्याड हल्ल्याचा निषेध करित या परिसरातील लोकांनी आता सरकारने गप्प न बसता जश्यास तसे उत्तर दिले पाहिजे अशा तीव्र भावना व्यक्त केल्या, आणि शहिदांना दत्त चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.