Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १७, २०१९

छत्रपतींचा मान हाच आमचा स्वाभिमान:खा.कृपाल तुमाने

वाडीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणजय भवानी,जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमली वाडी

वाडी ( नागपूर )/अरूण कराळे:

शिवबा हे एक चारित्र्य संपन्न व परधर्माप्रति सहिष्णुता बाळगणारे राजे होते .उच्च पदावर नेमणूक करतांना त्या व्यक्तीची जात,धर्म न पाहता देशप्रेम, राजप्रती आदर,निष्ठा युद्धनैपुण्य हे गुणवैशिष्ट्ये परखुनच त्या व्यक्तीची नियुक्ती करीत सर्वधर्मसमभाव हा मूलमंत्र छत्रपतींनी आयुष्यभर जोपासला,धर्म व राजकारण याची फारकत करून सर्वधर्मसमभावाची रयतेला शिकवण दिली.शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर शिवाजीराजे ही आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे .आणि ती ऊर्जा प्रत्येक आजच्या तरुण मावळ्यांनी अंगीकारली पाहिजे .छत्रपतींचा मान हाच आमचा स्वाभिमान आहे .असे प्रेरणादायी मार्गदर्शन खासदार कृपाल तुमाने यांनी केले.

आदर्श वाडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक खडगांव रोड येथे श्री छत्रपती शिवराजे प्रतिष्ठान वाडी तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण  श्रीमंत डॉ . मुधोजी राजे भोसले यांचे हस्ते करण्यात आले . अध्यक्षस्थानी खासदार कृपाल तुमाने होते . तर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार समीर मेघे,माजी मंत्री रमेशचंद्र बंग,नगराध्यक्ष प्रेम झाडे,युवासेना जिल्हाप्रमुख तथा बांधकाम सभापती हर्षल काकडे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे ,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संतोष केचे,शिवराजे प्रतिष्ठानचे आनंदबाबू  कदम,गटनेता राजेश जयस्वाल,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख चंद्रशेखर येवले, आरोग्य सभापती शालिनी रागीट, शिक्षण  सभापती मीरा परिहार, महीला व बालकल्याण  सभापती कल्पना सगदेव प्रमुख्याने उपस्थित होते .कार्यक्रमादरम्यान  होमहवन ,अभिषेक व महाप्रसाद आदी कार्यक्रमांनी परिसर भक्तीमय झाला .शिवराजे ढोल ताशा पथक ,आम्ही मराठी ढोल ताशा पथक , राष्ट्रवंदना ढोल ताशा पथक , माऊली ढोल ताशा पथकांच्या  गजरांनी  परिसर  दुमदुमून गेला होता .

यावेळी बसपा जिल्हाप्रमुख राजकुमार बोरकर,भारिप-बहुजन महासंघ जिल्हाप्रमुख नितेश जंगले, शिवसेना तालुका प्रमुख संजय अनासाने,हरिष हिरणवार,शिवसेना शहर प्रमुख प्रा .मधु मानके पाटील , शिवसेना नेते ( कोषाध्यक्ष ) वसंतराव इखनकर ,कपिल भलमे,विजयभैय्या मिश्रा ,रुपेश झाडे,अखिल पोहनकर,क्रांती सिंग,शत्रुधन परीहार,राकेश मिश्रा,पुरुषोत्तम रागीट,सतिश जिंदल,अशोक माने, प्रकाश कोकाटे ,मोहन ठाकरे,आशिष नंदागवळी,राजू शेळके,नंदा कदम,राजेश जिरापूरे,सचिन बोंबले,राष्ट्रपाल वाघमारे,मानसिंग ठाकूर ,योगेश चनापे, संतोष केसरवाणी  , अॅड . अरूण तैले राजाभाऊ जोध , विलास भोंगळे , महेश रागीट,  ओंकार तलमले , लोकेश जगताप आदीसह हजारोंच्या संख्येने शिवभक्त   उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.