पुसेसावळी : खटाव तालुक्यातील राजकीय व व्यापारीदृष्ट्या महत्वपुर्ण असलेल्या पुसेसावळी गावातील दत्त चौकात वाहतुक कोंडी ही नित्याची बाब बनलेली असुन याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाशी वर्गाकडुन बोलले जात आहे.
सध्या दत्त चौकातमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असुन त्याबाबतची कंट्रोन यंत्रणा पुसेसावळी दुरक्षेत्रात असुन देखील या दत्त चौकात होणार्या वाहतुक कोंडीबाबत प्रशासन उदासिन असल्याचे जाणवत आहे.
तरी या चाैकात वाहतुकीचा बोजवारा मोठ्याप्रमाणात असल्यामुळे वाहतुक कोंडी होत असल्याचे चित्र दिसत असुनही याबाबत प्रशानाकडून वाहतुक अधिकार्याची नेमणुक करणे गरजे असताना देखील याठिकाणी या अधिकार्याची नेमणुक होत नाही,
तरी या परिसरातील प्रवासीवर्ग व स्थानिक मंडळीकडुन तोंडी व लेखी निवेदने दिलेली असताना देखील याबाबत ठोस निर्णय होत नाही त्यामुळे प्रवाशी वर्गातुन प्रशासनाबाबत नाराजीचे सुर उमटत आहे.
तसेच या चोैकातुन कराड, सातारा,सांगली, कडेगाव,उंब्रज,वडुज,पंढरपुर,अाैंध मायणी या परिसरात जाण्यासाठी मोठ्याप्रमाणात वाहतुक होत असते, तरी या चौकात टु व्हिलर चारचाकी यांचे पार्कीग रस्त्याच्या बाजुला असल्यामुळे मोठी वाहने आल्यास वाहतुकीचा खेळ खंडोबाच होतो,त्यामुळे या पार्कीगचा ही प्रश्न मार्गि लागने गरजेचे आहे.
त्यामुळे या चौकातील वाहतुकीची कोंडीवर लवकरात लवकर निर्णय घेऊन चौकातील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावावी हिच माफक अपेक्षा प्रशासनाकडुन असल्याचे प्रवाशीवर्गाकडुन बोलली जात आहे.