नागपूर / अरुण कराळे:
नागपूर तालुक्यातील दवलामेटी सर्कल भाजपातर्फे काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून पाकड्यांना धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकारनी कठोर पावले उचलण्याची मागणी करीत दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला . यावेळी नागपूर पं. सं. उपसभापती सुजित नितनवरे,उपसरंपच गजानन रामेकर , माजी सरपंच संजय कपनीचोर, प्रकाश डवरे, प्रशांत केवटे, रमेश गोमासे , कमलाकर इंगळे , सचिन खील्लोरे, विजय कुकडे, सचिन खोब्रागडे, राम घडोले , रविंद्र खैरकर , गजानन कुकडकर, दिपक भोसले , विमलेश शरण, स्वरूप बिस्वास आदीसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.