नागपूर/प्रतिनिधी
पंचायत समिती नागपूर अंतर्गत वाडी समूह साधन केंद्रातील जिप च्या सोळा शाळेतील चारशे विद्यार्थ्यांच्या सहभागाने केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दि.28 व 29 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात पार पडल्या.
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृती दिनी स्पर्धेचे उदघाटन दृगधामना हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा. सुरेंद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय पोषण आहार राजपत्रित अधिकारी राजेश लोखंडे,ज्येष्ट शिक्षण विस्तार अधिकारी छाया इंगोले, शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर, केंद्रप्रमुख शरद भांडारकर, ग्राम विकास अधिकारी विष्णू पोटभरे, मुख्याध्यापक भास्कर क्षीरसागर, पुष्पा गावंडे, कमलाकर राऊत, ज्योती फर्नांडिस, तसेच वनिता नान्हे,अध्यक्ष, शा व्य समिती व ग्रा पं चे गजानन रामेकर,रमेश गोमासे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री सरस्वती व म ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच क्रीडा ध्वजारोहण करून पार पडले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीत व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या दरम्यान वाडी केंद्रातील सेवा निवृत्त झालेल्या मुख्याध्यापक दीपक तिडके, प्रकाश कोल्हे, अलका असलमोल व पदवीधर शिक्षक माणिक ठाकरे यांचा शॉल, श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी उ प्रा शाळा, दवलामेटी (टोली) शाळेतील मुलींनी आकर्षक लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
पहिल्या दिवशी सांघिक मैदानी खेळ सुरू असतांना *पं स चे गटविकास अधिकारी किरण कोवे व विस्तार अधिकारी कुहीटे* यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहित करून स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाची प्रशंसा केली.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मैदानी वैयक्तिक, सांस्कृतिक लोकनृत्य व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या.
विविध स्पर्धेत विजयी झालेल्या चमू पुढीलप्रमाणे
वरिष्ठ गट
कबड्डी मुले- उ प्रा शाळा, सोनेगाव (नि), कबड्डी मुली- उ प्रा शा वाडी क्र 2, खो-खो मुले व मुली उ प्रा शा दवलामेटी (टोली), लंगडी-उ प्रा शा वाडी क्र 2, लोकनृत्य- दवलामेटी (टोली),रिले रेस मुले-दवलामेटी (टोली), मुली-वाडी क्र 2, आटयापाट्या मुले-सोनेगाव (नि), आटयापाट्या मुली-वाडी क्र 2,
कनिष्ठ गट
कबड्डी मुले- उ प्रा शाळा डिफेन्स (हिन्दी), कबड्डी मुली-उ प्रा शाळा सोनबानगर, खो खो मुले- उ प्रा शा दवलामेटी (टोली), खो खो मुली-उ प्रा शा सोनबानगर, लंगडी- उ प्रा शा श्रमिकनगर (हिंदी), लोकनृत्य-उ प्रा शाळा डिफेन्स (हिंदी)
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वश्री युवराज उमरेडकर, रामेश्वर मुसळे, प्रकाश धवड, विजय बरडे, पुरुषोत्तम चिमोटे, कमलाकर उताणे, पुरुषोत्तम अन्नपूर्णे, सचिन कळपाते, अनिल गेडाम, प्रवीण मेश्राम, साहेबराव मोहारे, रुपेश भोयर, राजेश पानतावणे, भास्कर भोंडे,अनिता जावळकर, सीमा महल्ले, प्रभा दुधे, मंजुषा काकडे, वंदना घोरमाडे,प्रिया नंदेश्वर, कमल शंभरकर,ज्योती गवई,करुणा आडे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख शरद भांडारकर , संचालन अनिता जावळकर व आभार प्रदर्शन कमलाकर राऊत यांनी पार पाडले.