Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २२, २०१९

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर करण्याचे जिल्ह्यातील खेळाडूंना आवाहन

Image result for तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसचंद्रपूर/प्रतिनिधी: 
केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजना अंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन 2018 साठी चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू यांनी दिनांक 23 एप्रिल 2019 पर्यंत नामांकनाचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सादर करण्याचे आवाहन केले आहे. त्या प्रस्तावासोबत खालील आवश्यक कागदपत्र, माहिती, प्रमाणपत्र, कात्रणे इत्यादी जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सादर करावे.

1. नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षातील म्हणजे सन 2016, 2017, 2018 मधील असणे आवश्यक आहे. 2. साहसी उपक्रम हे जमिनीवरील, समुद्रावरील व हवेमधील असणे आवश्यक आहे. 3. त्या खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक असून त्याबाबतची माहिती दोन ते तीन पानामध्ये हिंदी किंवा इंग्रजी या भाषेमध्ये देणे गरजेचे आहे. (सदर साहसी पुरस्कार हा केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेअंतर्गत येत असल्याकारणाने हिंदी किंवा इंग्रजी या भाषेमध्ये आवश्यक)

केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेअंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन 2018 साठी चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे उपलब्ध असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी कळविले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.