Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २२, २०१९

विमा अभिकर्त्याची कन्या बनली PSI

खापरखेडा-प्रतिनिधी

परिसरात असलेल्या भारतीय जिवन विमा निगमच्या अभिकर्त्या व सामाजिक कार्यकर्ता अरुणा आनंद शिंदे यांची कन्या आकांक्षा शिंदे हिने नुकतीच पीएसआय परिक्षा उत्तीर्ण केली आहे.

आकांक्षाचे शिक्षण महाराष्ट्र विद्यालय येथे झाले असून तिने दहाव्या वर्गात 84% गुण मिळविले होते. महाविद्यालयीन शिक्षण धरमपेठ महाविद्यालय नागपूर येथे पूर्ण करून पुढील शिक्षणाकरिता इंस्टिट्यूट ऑफ सायन्स मधून बीएससी व एमएससी परिक्षा उत्तीर्ण केल्या मात्र आकांक्षाला पोलीस दलात आपले करियर करायचे असल्यामुळे तिने एम पी एस सी परीक्षेची तयारी केली. पहिल्यांदा तिला अपयश आले मात्र ती खचली नाही उलट जिद्द, मेहनत, चिकाटीने तयारी केली यावेळी तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळाले व तिने मुख्य परीक्षा पास केली परंतू यावेळी तिच्या पायाला दुखापत झाली त्यामुळे ती शारीरिक चाचणीत अपयशी ठरली मात्र तिसऱ्या प्रयत्नांत परत तिने अपेक्षेनुसार यश मिळवले आकांक्षाचे वडील बाबा शिंदे व मोठी बहीण डॉली यांनी सुद्धा शालेय जिवनात वर्गात पहिले होते आई अरुणा भारतीय जिवन विमा निगमच्या अभिकर्त्या (एजंट) असून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रसर राहिल्या आहेत. आकांक्षाच्या उल्लेखनीय यशाबद्दल आ सुनील केदार, आशिष उपासे, सरपंच रविंद्र चिखले, मुख्याध्यापक लक्ष्मण राठोड, मनोहर वानखेडे, सुनील जालंदर, सुधाकर उपासे, विजय वासनिक राहुल जालंदर, अरविंद सरोदे आदिनी अभिनंदन केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.