Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २२, २०१९

विद्यापीठाची पदवी म्हणजे जबाबदार नागरिक बनण्याची प्रक्रिया

प्रा.डॉ. रमेश कुंभार यांचे प्रतिपादन 

मायणी, ता.खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे)

विद्यापीठाची पदवी धारण करणे म्हणजे जबाबदार नागरिक बनण्याची प्रक्रियाआहे  पदवी धारण केल्यानंतर स्वतः चा आत्मविश्वास वाढतो स्नातकाने सखोल ज्ञान व संशोधन याला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. रमेश कुंभार यांनी केले ते मायणी येथील कला वाणिज्य महाविद्यालयात प्रथम पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव श्री सुधाकर कुबेर हे होते.

    प्रारंभी सन्माननीय अतिथी व स्नातक यांचे मिरवणूकने सभागृहात आगमन झाले दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी केले

यावेळी संचालक श्री.एन.व्ही.कुबेर,विध्यार्थ्यांती,सर्व प्राध्यापक वर्ग,पत्रकार श्री. सतीश डोंगरे अधी मान्यवर उपस्थित होते

स्नतकांची जबाबदारी स्पष्ट करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधाकर कुबेर  म्हणाले आई वडलांच्या स्वप्नाला पूर्णत्व देण्यचे कार्य या स्नातकानी केले आहे आता ते मानसन्मान आणि प्रतिष्ठित नागरिक म्हणून वावरण्यास पात्र झाले आहेत स्नातकानी आपले ध्येय ठरवले पाहिजे आणि समाजात जबाबदारी ची पदे भुषविली पाहिजेत 

आभार प्रदर्शन परीक्षा संचालक डॉ. विलास बोदगिरे यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले राष्ट्रगीताने समारंभाचे समारोप झाला


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.