Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २२, २०१९

ट्रॅक्टरखाली दबून चालक ठार


मनोज चिचघरे/भंडारा प्रतिनिधी 

लाखांदूर : तालुक्यातील खैरी मासळ येथे गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पार सरळीकरणाचे काम सुरू आहे. 

काम करीत असताना झालेल्या अपघातात ट्रॅक्टर खाली दबून चालक ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान खैरी मासळ येथे घडली. निकेश मानकर वय  (३२) वर्ष रा, मागंली असे मृतकाचे नाव आहे. निकेश मानकर हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पार सरळीकरण करीत होता. 

अचानक त्यांचा तोल गेल्याने तो खाली पडला व त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर पलटी होऊन तो दाबला गेला. त्यामुळे घटनास्थळीचं त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. पोलिस तपास लाखांदूर पोलिस करीत आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.