Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०६, २०२०

वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा

अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे जाहीर आवाहन



भंडारा : दि. ५ ऑक्टोबर
अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे महाराष्ट्राच्या तळागाळातील विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी म्हणून दि. १५ ऑक्टोंबर २०२० ला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' निमित्ताने वाचन संस्कृती व चळवळ अधिक समृद्ध करण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली असून जास्तित - जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे फाऊंडेशन तर्फे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

     कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे जरी शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्न पुर्तीकरिता वाचन विकास घडवून आणणे काळाची गरज आहे. याअनुषंगाने सदर ऑनलाईन स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थी व पाल्यास सहभागी होण्यासाठी संबंधित शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेवून याबाबत पालकांना अवगत करून ई - मेल आयडी तयार करण्यास मार्गदर्शन करावे. कारण सदर प्रश्न संच सोडवल्या नंतर सहभाग प्रमाणपत्र ई-मेल वरच पाठवण्यात येणार असल्याने ऑनलाईन प्रश्न संच सोडवताना नाव व ईमेल आयडी आवश्यक आहे.


       सदर राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा ही इयत्ता १ ली ते ५ वी चा पहिला गट, इयता ६ वी ते ८ वी चा दुसरा गट तसेच इयता ९ वी ते १० वी चा तिसरा गट या तीन गटात होणार असून ऑनलाईन प्रश्नमंजूषा सोडवण्याकरिता आवश्यक लिंक अग्निपंख फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यांच्या व्हाट्सअॅप समुहांमध्ये दि. १० ऑक्टोंबरला पुरविण्यात येईल. या स्पर्धेत शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्वच व्यवस्थापनेच्या व संवर्गाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
       शिक्षक व पालक यांनी नोंद घेवून या राज्य स्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत जास्तीत - जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचे अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे राज्य समन्वयक गजानन गोपेवाड, महिला राज्य समन्वयक जयश्री सिरसाटे तसेच नागपूर विभागीय समन्वयक दामोधर डहाळे यांनी जाहीर आवाहन केले आहे आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.