नागपूर – व्हिसीए च्या जामठा येथील मैदानावर मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या एक दिवशीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्या दरम्यान संभाव्य देशविघातक क्रुत्य करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी टेरेरिस्ट मोड्युल वर विशेष नजर रोखण्यात आली आहे.
नागपूर अतिरेक्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून टार्गेट आहे.पुलवामा येथे अतिरेक्याव्दारे सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघाती हल्ला करण्यात आल्याच्या घटने नंतर भारताने या पुढे पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळू नये अशी जनतेच्यावतीने मागणी रेटून धरून दबाव वाढविण्यात आला.या पार्श्वभूमीवर अतिरेकी हस्तकाव्दारे अनुचित प्रकार घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही परिस्थिती लक्षात घेता पोलीस व्दारे टेरेरिस्ट मोड्युलवर वाँच ठेवण्यात आला असल्याचे सूत्रानुसार समजते.
अतिरेकी हस्तकाव्दारे काही तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून , लक्ष्यासाठी ब्रेन वाँश करण्यात येते व त्यांचे ग्रुप तयार करुन,नंतर घातपातसाठी वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात येते.याला साधारणतः टेरेरिस्ट मोड्युल संबोधले जाते.पाकिस्तान सोबत भारताने क्रिकेट सामना खेळू नये या विरोधाचे पार्श्वभूमीवर अतिरेकी हस्तकांच्या संभाव्य कारवायांंना प्रतिबंध घालण्यासाठी अतिरेक्यांचे स्लिपर सेल , प्रतिबंधक संघटनेत काम करणाऱ्या आजीमाजी सदस्यांच्या हालचालीचा माग घेण्यात येत असल्याचे समजते. याशिवाय गर्दीत नक्षल्यांवर नजर ठेवण्यासाठी गुप्तहेर पेरण्यात आले असून,गडचिरोली, भंडारा , गोंदिया व अन्य ठिकाणीच्या खुपियांना पाचारण करण्यात आले आहे