वरोरा/ प्रतिनिधी
आदिवासीच्या ना ना रितिच्या प्रश्नांना सामोरे ठेऊन उद्याची आदिवासीची खरी गरज काय ? हे लक्षात घेता आदिवासीच्या सर्व संघटना एकत्र येऊन एकत्र हल्ला बोल करायचा ह्या उद्देशाने सर्व आदिवासी संघटनाचे महाशक्ती प्रदर्शन वरोरा इथे हजारोंच्या संख्येने पार पडले.
ह्या महाशक्ती प्रदर्शनाचे आयोजन आदिवासी समन्वय मंच व गोंडवाना गणतंत्र पार्टी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते .ह्या कार्यक्रमानिमित्त सर्व संघटना आता नेमका कुठला संदेश देतात व आदिवासी समन्वय मंचाचे प्रमुख आ .दिनेश बाबूराव मडावी नेमका कुठला संदेश कुठले आव्हान करतात ह्या हेतूने उपस्थित झालेला आदिवासी तप्त अशा उन्हातहीं न डळमळता तग धरून सायंकाळी 07:00 वाजेपर्यंत ठाण मांडून बसला होता.
सर्वत्र दिनेश बाबूराव मडावी आगे बढो हम तुम्हारे साथ है ! , अभी नही तो कभी नही ! , लेकर रहेंगे अपना हक!, यह सरकार भगाणी है , आदिवासी सत्ता लानी है ! असा नारा दुमदुमत होता व आदिवासी छाती ठोकत शपथ घेत होता . आ .दिनेश भाऊ मडावी यांनी अध्यक्ष स्थाना वरून आदिवासी एकतेचा नारा देत आपल्या मताची किमत काय व त्याचा वापर फक्त आदिवासी हितासाठीच झाला पाहिजे म्हणून येत्या 2019 मधे गोंडवाना गणतंत्र पार्टीला सोबत घेऊन महाराष्ट्रातील 48 विधानसभा क्षेत्रावर जिथे बहूसंख्य आदिवासी आहे तिथं प्रतिनिधी उभा करूच असे ठोस आश्वासन दिले .व चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात आदिवासीच वर्चस्व असून तिथून समाजाच्या आग्रहाखातिर वेळ आल्यास ह्या बोगस प्रेमी व धनगराचा हितचिंतक असलेल्या हंसराज अहिर ह्या ग्रुहमंत्र्यास निश्चितच पाडून आदिवासीच नेतृत्व प्रस्थापित करू असे आव्हान केले .ह्या प्रसंगी दिनेश मडावी यांनी आदिवासीची गळचेपी कशी केल्या जात आहे यावर सखोल मांडणी करीत एकीकडे प्रशासनिक तर एकीकडे राजकिय लढा होणे अत्यंत गरजेचे असल्याचे बोलून दाखविले व स्वतःच्या अस्मिता लढ्यात आदिवासीनी गल्ली ते दिल्ली रस्त्यावर उतरूनच आपले संविधानीक हक्क व अधिकार पदरी पाडून घेता येईल असे स्पष्ट केले .तसेच भद्रावती वरोरा ह्या विधानसभा क्षेत्राकरिता आ .रमेशभाऊ मेश्राम ह्यांची लोकप्रियता व कार्य लक्षात घेऊन उमेदवारी जाहिर केली .व आवर्जून सांगितले की , जेव्हा हा कार्यक्रम नागपूर इथून वरोरा ला हलविण्याचे निश्चित झाले तेंव्हा रमेशभाऊने जी तन मन धनाची तयारी दर्शवीत एक लढवय्या म्हणून जी भूमिका हातात घेतली त्यामुळेच आज हा आदिवासी हल्ला बोल इथे यशस्वी रित्या पार पडत आहे म्हणून सांगितले .
भोला मडावी यांनी प्रास्ताविक भाषणातून वस्तुस्थिती लक्षात घेत आदिवासी हल्ला बोल म्हणजे काय व तो का नागपूर इथून हलवून वरोरा इथे का घेण्यात आला याचे स्पष्टीकरण देत दिनेश बाबूराव मडावी आदिवासी समाजासाठी कुठल्या पद्धतीने आदिवासी समाजासाठी कार्यशील आहे व त्याकरिता त्यांनी आपलं घर गहाण ठेऊन आदिवासी लढा समाजाचा एकही पैसा न घेता पुढे चालवीलेला असल्याचे बोलून दाखविले .तसेच सर्व आदिवासी बांधवांना अभिनंदन देत आता राजकिय क्रांती करण्याची भूमिका प्रास्ताविकातून स्पष्ट केली .
उद्घाटक म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महासचिव मधुकर उईके यांनी गोंडवाना आता कुणाच्या सोबत नाही तर स्वः बळावर आपला किल्ला लढवेल व आदिवासी समन्वय मंच त्यांच्या सोबतीला असल्यामुळे आता माघार नाही असे आव्हान केले .
तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अपघात झाल्यामुळे न येऊ शकल्याने मोबाईल वरून आपल्या स्थानिक घरून आदिवासी हल्ला बोल ह्या महाशक्ती प्रदर्शनात उपस्थित झालेल्या समाजास संबोधित केले .
सूत्रसंचालन कु .रंजनाताई किन्नाके तर आभार प्रदर्शन रमेश भाऊ मेश्राम यांनी पार पाडले .
ह्या आदिवासी हल्ला बोल कार्यक्रमात मन्चकावर आदिवासीच्या सर्व प्रमुख संघटना व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते व त्यांनीही आदिवासी समाजाला संबोधित केले .
ह्या प्रसंगी मनोज आत्राम , प्रमोद बोरीकर , कमलेश आत्राम , बाबाराव मडावी , नरेश गेडाम , राजू चांदेकर , विलास परचाके , महेंद्र शिंदे ,गीत घोष आदि मान्यवरांनी भाषण केली. ह्या कार्यक्रमासाठी चंद्रपूर जिल्ह्या व्यतिरिक्त गडचिरोली , यवतमाळ, वर्धा, गोंदिया, भंडारा, अमरावती, वाशीम , नांदेड , औरंगाबाद , पुणे व मुम्बईहूनहीं मोठ्या संख्येने आदिवासी समाज उपस्थित झाला होता. ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रामुख्याने रमेश मेश्राम , भोला मडावी , शंकर उईके , अमोल आत्राम , मारोती जुमनाके , विनोद शेडमाके , बंडॊपंत कोटणाके ,भारत आत्राम , ज्ञानेश्वर मडावी , महीपाल मडावी , क्रुष्णा मसराम , मेश्राम , दिवाकर मसराम , छबन कन्नाके , साईनाथ कोडापे , पुंडलिक पेन्दाम , संभा मडावी तथा अन्य यांनी अथक परिश्रम घेतले .