Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १५, २०१९

प्रलंबित विकास कामांबाबत त्वरित कार्यवाही करा:आ.सुधाकर कोहळे

आमदार सुधाकर कोहळे यांचे निर्देश
नागपूर/प्रतिनिधी:
 दक्षिण नागपुरातील विविध भागामध्ये नागरिकांच्या अनेक समस्यांसदर्भात सुविधांसंदर्भात अनेक मागण्या करण्यात आल्या. मात्र अनेक दिवसांपासून या मागण्यांवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्वरित सर्व प्रलंबित मागण्यांवर कार्यवाही करा, असे निर्देश दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेशी संबंधित दक्षिण नागपुरातील विविध कामांसंबंधी शुक्रवारी (ता.१५) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्तांच्या दालनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार सुधाकर कोहळे बोलत होते.

बैठकीमध्ये आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त अभिजीत बांगर, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेविका स्नेहल बिहारे, मंगला खेकरे, स्वाती आखतकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.
बैठकीमध्ये राजाबाक्षा हनुमान मंदिर सौंदर्यीकरण, रमना मारोती मंदिर सौंदर्यीकरण, बुधवार बाजार येथील विकास कामे, मानेवाडा दहन घाटाचे सौंदर्यीकरण, दक्षिण नागपुरात मनपा अंतर्गत करण्यात आलेले सीमेंट रस्ते, पूर्व बालाजी नगर पंचकमेटी हनुमान मंदिर येथील साऊंड सिस्टीम व तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती, मनपा अंतर्गत दक्षिण नागपुरातील झोपडपट्टी धारकांना पट्टे वितरण, सक्करदरा तलावात मासेमारी करण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविणे, नगरोत्थान येथील उद्यानाच्या निविदा, दक्षिण नागपुरातील दिव्यांगांना बॅटरीवरील ट्रायसिकल मिळणे, सक्करदरा अग्निशमन विभागाच्या रिक्त जागेवर हॉकर्स झोन व पार्किंगची निर्मिती करणे, मोठा ताजबाग व सिंधीबन येथील झोपडपट्टीबाबत, आशीर्वाद नगर इंदिरा गांधी सभागृहात अभ्यासिका सुरू करण्याबाबत, निर्मल नगरी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत, गजानन मंदिर ते प्रोसेस सभागृहादरम्यान रस्ता तयार करणे, म्हाळगी नगर पाण्याची टाकी या विषयांचा आढावा घेण्यात आला.

राजाबाक्षा हनुमान मंदिर, रमना मारोती हनुमान मंदिराच्या सौंदर्यीकरणाबाबत अद्यापही निविदा न निघल्याने यासंदर्भात त्वरित निविदा काढणे, बुधवार बाजार येथील विकास कामांच्या संदर्भातही त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार सुधाकर कोहळे यांनी दिले. मानेवाडा दहनघाट सौंदर्यीकरणाबाबत तात्काळ कार्यवाही करणे, मनपा अंतर्गत दक्षिण नागपुरातील झोपडपट्टी पट्टे वाटपासंदर्भात आवश्यक मार्गदर्शनाचे पत्र तात्काळ शासनाकडे पाठवून नागपूर महानगरपालिकेने पट्टे वाटपासंदर्भात कारवाई करण्याचे आमदार सुधाकर कोहळे यांनी निर्देशित केले.

सक्करदरा परिसरात हॉकर्स झोन व पार्किंगची सुविधा नसल्याने परिसरातील दुकानदारांसह नागरिकांनाही वाहतूक व अन्य त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात सक्करदरा येथील अग्निशमन विभागाच्या रिक्त जागेवर हॉकर्स झोन व पार्किंगची निर्मिती करण्यात यावी यासाठी परिसरातील दुकानदारांनी निवेदन सादर केले. तुकडोजी चौक ते क्रीडा चौकादरम्यान सिमेंट रस्ता, सक्करदरा तलावात मासेमारी करणे व नगरोत्थान येथील उद्यानाच्या निविदा प्रक्रियेबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करणे, लवकरात लवकर दक्षिण नागपूरातील दिव्यांगांना बॅटरीवरील ट्रायसिकल देणे, विद्यार्थ्यांच्या सुविधेच्यादृष्टीने आशीर्वाद नगर इंदिरा गांधी सभागृहात तातडीने अभ्यासिका सुरू करणे यासह सर्वच प्रलंबित मागण्यांसंदर्भात आवश्यक अडचणी दूर करून तातडीने कार्यवाही करून पूर्णत्वास नेण्याचे निर्देश यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.